नागपुर समाचार : मुलगी कर्नाटक राज्यातील आणि मुलगा महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यात राहणारा असून दोघेही सोशल मिडियाचा माध्यमातून प्रेमात पडले. दोन्हीही जोडपे मुस्लिम धर्मीयातील असून धर्माचा भिंती तोडून त्यांनी नागपुरात मुस्लिम रितीरिवाजाप्रमाणे लग्न केले. परंतु आमच्या दोघांचे जीवाला धोका असल्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी गृह विभागाकडून सुरक्षा द्यावी अशी मागणी मुस्लिम धर्मातील प्रेमी जोडप्यांनी पत्रपरिषदेत केली आहे.
पत्रकार भवनात राहील शेख आणि रबा मोहम्मद अब्दुल मतीन या प्रेमी जोडप्यांनी आपली आपबिती सांगितली.. मुलगी रबा मतीन 22 वर्षीय असून मुलगा राहील शेख हा 26 वर्षाचा आहे.. दोघेही मुस्लिम धर्मातील आहे.. मात्र रबा चे वडील मुलीचा विवाह तिचा वया पेक्षा जास्त पुरुषाशी करीत असल्याने तिचा त्याला विरोध आहे.. त्यामुळे रबा थेट कर्नाटक मधून महाराष्ट्रात दाखल होत आपला प्रियकर राहील शेख सह नांदेळ मार्गे नागपुरात वणवण भटकत होते. नागपुरात हिंदू समाजातील काही नागरिकांनी त्यांना मदत करीत आपल्या मुस्लिम धर्मातील मित्रांना सोबत घेत त्यांचा विवाह कामठी रोड वरील वंजारा येथील मदिना मशीद चे इमाम यांनी त्यांचा मुस्लिम रितीरिवाजाप्रमाणे निकाह केला. मात्र त्यांना आताही त्यांचा सुरक्षेची काळजी वाटत आहे..
नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कामाकडे बघता नागपुर हे मुस्लिम युवक, युवती करीता सुरक्षित समजून या जोडप्यांनी नागपुरात निकाह करण्याचे ठरविले. निकाह केला. आता मात्र ते गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्रयाला येत त्यांचा नावाने हैदराबाद हाऊस येथे निवेदन देत आम्हाला पोलिसांनी सुरक्षा द्यावी. आम्हाला शांतपणे जगू द्यावे, आम्हाला आमचा पालकांपासून सुरक्षा द्यावी ही एकमेव या जोडप्यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे.. या जोडप्यांनी कर्नाटक राज्यातील पोलिस महासंचालक, महाराष्ट्र राज्याचे पोलिस महासंचालक, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, परभणी जिल्हाचे पोलिस अधीक्षक यांनाही आपल्या सुरक्षेची मागणी केली आहे..
कर्नाटक बिदर मधून रबा हीने राहिल ला फोन करून सांगितले की माझे आई-वडील माझ लग्न वयस्कर व्यक्तीशी दुसऱ्या ठिकाणी करून देत आहे. ते मला मान्य नाही ! माझ्या घरचे माझ्या विरोधात आहे. म्हणून मी परभणीला येतो आपण दोघेही लग्न करू असे रबा ने म्हटले. जर माझ त्यांच्यासोबत लग्न झालं तर मी माझ्या जीवाचं बरं वाईट करीन असे राहीलशी बोलली. राहील चे तिच्यावर प्रेम होतंच परभणी वरून दोघेही पळ काढून नागपुरातील लग्न केले.
नागपूर शहर हे आमच्यासाठी सेफ असून खूप चांगलं शहर आहे. म्हणून आम्ही 14 July 2025 रोजी मुलीच्या मर्जीनुसार निकाह केला आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरचेच आहे. यांच्याकडून आम्हाला संरक्षण मिळावे अशी मागणी मुस्लिम धर्मातील प्रेमी जोडप्यांनी परिषदेत केली.