- Breaking News, नागपुर समाचार

नागपुर : सीताबर्डी मेन रोडला “व्हेइकल फ्री झोन” निवडण्यासाठी स्मार्ट सिटीचे सर्वेक्षण सुरु

सीताबर्डी मेन रोडला “व्हेइकल फ्री झोन” निवडण्यासाठी स्मार्ट सिटीचे सर्वेक्षण सुरु

नागपूर : नागपूर स्मार्ट ॲड सस्टेनेबल सिटी डेवलपमेंट कारपोरेशन लिमिटेडच्या वतीने सीताबर्डी बाजारपेठेत “स्ट्रीट फॉर पीपल” चे सर्वेक्षणास प्रारंभ झाला. केद्र शासनाचे गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालय च्या अंतर्गत “इंडिया सायकल्स फॉर चेंज चॅलेंज” हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. याच उपक्रमाच्या अंतर्गत “स्ट्रीट फॉर पीपल” हा ‍नवीन उपक्रम देखील अंर्तभूत करण्यात आलेला आहे. “स्ट्रीट फॉर पीपल” पायलट प्रोजेक्टमध्ये निवड करण्यासाठी नागपूर शहरातील मुख्य बाजारपेठेचा सतत सात दिवस सर्वेक्षण चालणार आहे. या मोहिमेची सुरुवात सोमवारी संध्याकाळी स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश मोरोणे यांनी सीताबर्डी बाजरपेठेतून केली. यावेळी वाहतुक पोलिस निरीक्षक पराग पोटे प्रामुख्याने उपस्थित होते.

सर्वेक्षणाच्या अंतर्गत सीईओ महेश मोरोणे यांनी दुकानदारांचे मत विचारले की सीताबर्डी बाजार पेठेत वाहनांचा प्रवेश प्रतिबंधित केला तर त्यांचा व्यवसायवर काय परिणाम होईल, सगळया प्रकारच्या वाहनांवर प्रतिबंध लावल्यास नागरिक बाजारपेठेत पायी चालू शकतील का ? नागरिकांशी बोलतांना त्यांनी सांगीतले की, मुख्य बाजारपेठेत व्हेइकल फ्री झोन केल्यामुळे हॉकर्सना देखील त्याचा फायदा होईल. चारचाकी आणि दुचाकी वाहनांसाठी वाहनतळाची व्यवस्था दुसरीकडे केली जाईल, असे ही यावेळी सांगण्यात आले.

नागपूर स्मार्ट सिटीच्या सर्वेक्षणाला दुकानदारांनी हॉकर्स आणि नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यांनी सांगितले की, “स्ट्रीट फार पीपल” केल्याने नागरिकांचा कल सीताबर्डी मार्केटकडे वाढेल आणि याचा लाभ सगळयांना होईल. काही नागरिकांनी प्रश्न केले की, वृध्द किंवा महिलांसाठी पायी फिरणे अवघड होईल त्यावर मोरोणे म्हणाले की, त्यांच्यासाठी ई-रिक्षाची व्यवस्था करण्यात येईल तसेच सायकलची व्यवस्था केली जाईल. युवा वर्ग या सायकलचा लाभ घेऊ शकतो. त्यांनी सांगीतले की सीताबर्डी बाजारपेठेला नवीन रुप देण्याचे प्रयत्न सुरु आहेत. नागरिकांशी भेटून त्यांचा सल्ला घेण्यात येईल. दुकानदारांना त्यांचा दुकानात माल आणण्यासाठी रात्रीच्या वेळेत परवानगी दिली जाईल सर्वेक्षणामध्ये एम चांडक कंपनी, खादी ग्रामोद्योग, हॉकर्स युनियनचे अध्यक्ष गोपीचंद आंभोरे आणि अन्य नागरिकांनी भाग घेतला.

हे सर्वेक्षण पुढील सात दिवस पर्यंत करण्यात येईल. याचा मुख्य उद्देश नागपूरात प्रदुषणविरहीत वाहनांना प्रोत्साहन देण्याचा आहे. नागरिकांची प्रतिक्रीया, सूचना व अभिप्राय लक्षात घेतल्यानंतर यावर पुढील उपाययोजना करण्यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *