- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : ‘माता’ आणि ‘माती’ या दोनच गोष्‍टी नवनिर्मिती करू शकतात – कांचन गडकरी

नागपूर समाचार : ‘माता’ आणि ‘माती’ या दोनच गोष्‍टी नवनिर्मिती करू शकतात. चांगले बियाणे मातीत रुजवल्‍यास त्‍याचे फळही चांगले, सुसंस्‍कारीत आणि विषमुक्‍त मिळते. त्‍यामुळे कुटुंबाचा महत्‍वाचा घटक असलेल्‍या स्त्रियांनी कुटुंब सांभाळताना शेतीकडे वळावे व परसबागेत तयार झालेल्‍या विषमुक्‍त भाजांच्‍या माध्‍यमातून कुटुंबाचे रक्षण करावे, असे आवाहन प्रयोगशील शेती करणा-या सामाजिक कार्यकर्त्‍या कांचन गडकरी यांनी समस्‍त महिलांना केले.

वसंतराव नाईक प्रतिष्ठान आणि वनराई फाउंडेशनच्या संयुक्त वतीने आज कांचन गडकरी यांना ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉ. सी. डी. मायी यांच्या हस्ते प्रयोगशील शेती पुरस्कार 2025’ प्रदान करण्यात आला. 30 हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ व स्‍मृतिचिन्‍ह असे पुरस्‍काराचे स्‍वरूप होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *