नागपूर समाचार : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनचरित्राचा सामान्य जनतेपर्यंत व्यापक प्रसार करण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पार्टी नागपूर महानगरतर्फे एक भव्य चित्ररथाचे आयोजन करण्यात आले आहे. हा चित्ररथ ३१ मेपर्यंत नागपूर शहरातील विविध भागांमध्ये भ्रमण करणार आहे.
या चित्ररथामध्ये ध्वनी विस्तारक यंत्राच्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे प्रेरणादायी जीवनचरित्र सादर करण्यात येणार असून, नागरिकांमध्ये त्यांच्या जीवनकार्यावर आधारित माहितीपत्रकांचे वितरण देखील करण्यात येणार आहे.
आज या चित्ररथाला भाजप शहर अध्यक्ष मा. श्री. दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते ध्वज दाखवून रवाना करण्यात आले. या प्रसंगी त्रिशताब्दी आयोजन समितीच्या प्रमुख सौ. अर्चना ताई डेहनकर, सौ. अश्विनी ताई जिचकार, बदल भाऊ राऊत, सौ. कविता ताई इंगळे, सौ. दीपाली ताई नंदनवार, सौ. श्वेता ताई भोसले, सौ. रजनी ताई जैन, सौ. ज्योती ताई शिंपी, सौ. तारा ताई भाकरे, अनिलजी मनापूरकर, सौ. मंंदा ताई पाटील आणि सौ. सोमू देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या चित्ररथाच्या यशस्वी नगरभ्रमणाची जबाबदारी भाजप महिला आघाडी, भाजयुवा मोर्चा, सांस्कृतिक आघाडी, क्रीडा आघाडी, सहकार आघाडी व शिक्षक आघाडी यांच्या संयुक्त प्रयत्नांनी समर्थपणे पार पाडण्यात आली आहे.