नागपूर समाचार : वंदनीय मधुराद्वैताचार्य प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराजांची ग्रंथसंपदा अपार आहे. त्यापैकी काही ग्रंथांची मागणी मोठया प्रमाणात आहे. त्यांच्या पुनर्मुद्रणासाठी माधान येथील श्री संत गुलाबराव महाराज संस्थानच्या पदाधिकाऱ्यांचे प्रयत्न सुरू होते. महाराजांच्या चरित्रासह त्यांच्या एकूण पाच पुस्तकांचे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने यशस्वीरीत्या पुनर्मुद्रण करण्यात आले आहे. या ग्रंथांचा प्रकाशन सोहळा रविवार, दि. १८ मे रोजी होणार आहे.
महाराजांचे अनुयायी आणि त्यांच्या कार्यावर संशोधन करणारे विद्वज्जन यांच्या उपस्थितीत दुसऱ्या माळ्यावरील सभागृह, एनरिको हाईट्स, हॉटेल रॅडिसन ब्लूच्या शेजारी, वर्धा रोड, नागपूर येथे रविवारी सायंकाळी ६.३० वाजता हा कार्यक्रम होईल, असे श्री संत गुलाबराव महाराज संस्थान, माधान, जि. अमरावती यांच्यावतीने कळविण्यात आले आहे.