🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनके करकमलों द्वारा ‘नवसखी जिलास्तरीय सरस प्रदर्शनी’ का उदघाटन
🔸ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणासाठी ‘नवसखी सरस महोत्सव’
नागपूर समाचार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र येथे जिल्हास्तरीय नवसखी सरस महोत्सवाचे उदघाटन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून आयोजित या महोत्सवात 100 स्टॉल्स उभारण्यात आले असून, 26 मार्चपर्यंत सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत प्रदर्शन सुरू राहणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या स्टॉल्सची पाहणी करून महिला उद्योजकांशी संवाद साधला. ग्रामीण भागातील महिलांचे जीवनमान उंचावण्यासाठी व त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, या उद्देशाने जिल्हा प्रशासनाच्यावतीने ही बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
या उदघाटनप्रसंगी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.