- Breaking News, क्राईम खबर , नागपुर समाचार

नागपुर : होम आयसोलेशनमध्ये आहात, प्रश्न आहेत, समाधान करा

आजपासून शंका समाधानसाठी फेसबुक लाईव्ह : मनपा-आयएमएचा संयुक्त उपक्रम

नागपुर : आपण लक्षणे नसलेले कोव्हिड पॉझिटिव्ह रुग्ण आहात, आपल्या मनात अनेक शंका असतील, प्रश्न असतील, प्रश्नांची उत्तरे मिळत नसतील. मात्र, आता घाबरू नका. नागपूर महानगरपालिका आणि आयएमए यांच्या संयुक्त पुढाकाराने आपल्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मिळतील. शहरातील आयएमएशी संलग्नित नामांकित डॉक्टर्स आपल्या शंकांचे निरसन करतील.

बुधवार, ९ सप्टेंबरपासून दुपारी २ ते ३ वेळेत हा उपक्रम दररोज सुरू राहील. प्रत्येक दिवशी वेगवेगळे डॉक्टर्स ‘कोव्हिड संवाद’च्या माध्यमातून मनपाच्या अधिकृत फेसबुक पेजवर लाईव्ह येतील आणि होम आयसोलेशनमध्ये असलेल्या तसेच कोव्हिड संदर्भात असलेल्या प्रत्येक प्रश्नांना उत्तरे देतील.

९ सप्टेंबरला होणाऱ्या ‘कोव्हिड संवाद’मध्ये अमेय हॉस्पीटलचे डॉ. आनंद काटे आणि कोठारी हॉस्पीटलच्या डॉ. अर्चना कोठारी नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे देतील. कार्यक्रमाची सुरुवात महापौर संदीप जोशी यांच्या प्रस्तावनेपर मार्गदर्शनातून होईल. नागरिकांनी या सेवेचा लाभ नागपूर महानगरपालिकेच्या अधिकृत फेसबुक पेजवरून घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *