- Breaking News

हिंगणघाट समाचार : हिंगणघाट येथे विरांगणा राणी दुर्गावती यांची ५०० वी जयंती उत्साहात साजरी

खा. फग्गनसिंग कुलस्ते, आ. समिर कुणावार यांची उपस्थिती

हिंगणघाट समाचार : विरांगणा राणी दुर्गावती यांचे ५०० वी जयंतीचा कार्यक्रम शहरातील नेहरू वॉर्ड येथील येथील विरांगना महाराणी दुर्गावती समाज भवनाचे प्रांगणात आज दि.५ ऑक्टोबर रोजी संपन्न झाला.

कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून लोकसभा एस टी/ एस सी समिती दिल्लीचे अध्यक्ष फग्गनसिंग कुलस्ते हे होते तर अध्यक्षस्थानी विधानसभा क्षेत्रातील कार्यसम्राट आमदार समीर कुणावार हे उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाची सुरुवात वीरांगना दुर्गावतीचे प्रतिमेला माल्यार्पण व पूजन करून करण्यात आली, विविध वाद्य वृंदासह शहरातील मुख्य मार्गाने शोभायात्राचे आयोजन करण्यात आले. यावेळी सर्व आदिवासी बंधू भगिनींनी मोठ्या उत्साहाने भाग घेत आनंदोत्सव साजरा केला. शोभायात्रेचे यशस्वी आयोजनानंतर दुपारी समाज प्रबोधनपर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.

उपरोक्त कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष प्रेम बसंतानी, भाजपा जिल्हा आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष शंकर आत्राम,माजी जि. प. अध्यक्ष नितिन मडावी इत्यादी मान्यवरांसह आदिवासी हलबा हलबी संघटनेचे केंद्रीय सचिव अजय कोटवार, प्रकल्प अधिकारी दिपक हेडावू, गिरीजा उईके, सेवानिवृत्त पोलिस उपायुक्त वसंत सयाम इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

उपरोक्त कार्यक्रमाचे आयोजन वीरांगना महाराणी दुर्गावती जयंती उत्सव समितीचेवतीने करण्यात आले. कार्यक्रमात प्रमुख अतिथीचे हस्ते जुडो क्रीडापटुंनी केलेल्या उत्तम कामगिरीकरीता सत्कार करुन गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमात माजी नगर सेविका नलिनी सयाम, पद्मा कोडापे, वैशाली पूरके, संजय सयाम, नरेश युवनाते, दमडूजी मडावी, माजी सरपंच शंकर धुर्वे, सोनु मडावी, पप्पू मडावी, प्रल्हाद पोयाम, मोहन तुमडाम इत्यादी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.  

हिंगणघाट व समुद्रपुर तालुक्यातील आदिवासी समाज बंधू आणि भगिनीं मोठया प्रमाणात जयंती कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल मडावी यांनी केले तर मंच संचालन योगीराज कोहचाडे, रवी कुकुड्डे यांनी केले. तर आभार प्रदर्शन नलिनी सयाम यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *