
गडचिरोली : गडचिरोली जिल्हा येथील भामरागड या तालुक्यामध्ये जन संघर्ष समिती नागपूर तर्फे स्वातंत्र्य दिन साजरा करताना आला स्वातंत्र्यदिना निमित्त लहान मुलामुलींना झेंडे व चॉकलेट आणि बिस्कीट चे वाटप करण्यात आला असून १४ ऑगस्ट भामरागड तालुक्यातील कोठी या गावात नक्षली भ्याड हल्ल्यात हुतात्मा झालेले पोलीस शिपाई स्व. दुशांत पंढरी नंदेश्वर यांना 15 ऑगस्ट ला जन संघर्ष समिती कडून कोठी या गावात श्रद्धांजली देण्यात आली.
कार्यक्रमात प्रमुख उपस्थति म्हणून श्री दत्ता शिर्के, डॉ श्रुती आष्टणकर, बरखाताई बडवाईक, रितेशजी बडवाईक, जगदीश वानोडे, महेशजी ढोबळे यावेळी उपस्थिती होती.