- Breaking News, नागपुर समाचार

नागपुर समाचार : लायन्स क्लब नागपुर आयुर्वेद चा पदारोहन संपन्न

डॉ.मृणालिनी थटेरे यांनी अध्यक्ष पदाची शपथ घेतली

नागपुर समाचार : होटल “कोर्णाक दि आर्क” सदर येथे ७ जुलै रोजी लायंस क्लब नागपुर आयुर्वेदचा पदारोहन कार्यक्रम संपन्न झाला. पदारोहन अधिकारी उपप्रातपाल एम.जे.एफ. विलास साखरे यांनी अध्यक्ष डॉ. मृणालिनी थटेरे, सचिव डॉ. प्रशांत गणोरकर, कोषाध्यक्ष डॉ.अमिता खोबरागड़े आणि नवीन टीमच्या सदस्यांना शपथ दिली. लायंस क्लब नागपुर आयुर्वेद ला जुडणाऱ्या नवीन सदस्यांचा शपथविधी समारोह रिजन चेयरपर्सन एम.जे.एफ. डॉ. पार्वती राणे यांनी पूर्ण केला.

याप्रसंगी झोन चेयरपर्सन एम.जे.एफ. धनंजय ठोंबरे उपस्थित होते. अध्यक्ष डॉ. मृणालिनी थटेरे यांनी वर्ष 2024-25 ला केल्या जाणाऱ्या कार्यक्रमाची संपूर्ण माहिती सभागृहात दिली. अध्यक्षीय पांच सूत्री कार्यक्रम आणि 2024-25 ला केल्या जाणाऱ्या वार्षिक कार्यक्रमाची माहिती “वार्षिक कॅलेंडर” द्वारा दिली. डॉ. संजय थटेरे यांनी लिहिलेल्या आणि संपादित केलेल्या “आयुर्वेद द्वारा स्वास्थ रक्षण के उपाय” पुस्तकाचे विमोचन अतिथिंच्या हस्ते संपन्न झाले.

लायन्स क्लब नागपुर आयुर्वेदची त्रौमासिक पत्रिका “आयु” पुस्तकाचे विमोचन अतिथिद्वारा संपन्न झाले. लायंस क्लब नागपुर आयुर्वेद द्वारा संचालित कार्यक्रम, नेत्रदान, अंगदान, देहदान, नो प्लास्टिक, नोइ पार्किंग आदिचे फ्लेक्स बोर्ड यांचे विमोचन अतिथिंच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे संचालन डॉ.संजय थटेरे यांनी तर आभार सचिव डॉ. प्रशांत गणोरकर यांनी मानले. हि माहिती लायंस क्लब नागपुर आयुर्वेदचे एडमिनिस्ट्रेटर डॉ. संजय थटेरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *