- Breaking News, आयोजन, नागपुर समाचार

नागपूर समाचार : रिफ्रेश व्यसनमुक्ती केंद्रा तर्फे पालकत्व व्याख्यान व चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण सोहळा संपन्न

नागपूर समाचार : रविवारी 28 एप्रिल रोजी नुकत्याच झालेल्या कार्यक्रम रिफ्रेश व्यसनमुक्ती उपचार केंद्र, लेडीज अँड जेंटस, च्यावतीने संचालिका प्रांजली वांढरे (ताल्हण) संस्थापक सुरेश वांढरे यांच्या मार्गदर्शनात “स्मार्ट पेंरेंटिंग” (आदर्श पालकत्व ) या विषयावर व्यसनमुक्ती जागृती साठी घेतल्या गेले. 

हे व्याख्यान केंद्राचे समुपदेशक ॲड. अनंत घुलक्षे यांनी घेतले. तसेच चित्रकला स्पर्धेच्या विजेत्यांना पुरस्कार वितरित केले गेले. ही स्पर्धा भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त 14 एप्रिल रोजी घेण्यात आलेली होती. यात विजेते वय वर्ष 9 ते 16 (गट अ) यात प्रथम उन्नती चौधरी, व्दितीय याशिका लांजेवार, तृतीय तनुश्री ढोरे, उतेजनार्थ मोहित लोथे आणि शिवांक खोडे तर वय वर्ष 4 ते 9 (गट ब) यात प्रथम फाल्गुनी लांजेवार, व्दितीय ओवी बहुरूपी, तृतीय अवध भिवगडे, उत्तेजनार्थ अर्णव कोकाटे आणि भार्गवी चौधरी आहे. या कार्यक्रमाचे संचालन अरुणाताई भोंडे यांनी केले.

यात प्रमुख अतिथी अतुलजी लोंढे, कल्पणाताई मानकर, प्रविण सांदेकर (माजी नगर सेवक) ॲड. समिक्षा गणेशे आणि संजय विसपुते होते. मोठ्या संख्येने पालक वर्ग आणि विद्यार्थ्यांचा यात समाविष्ट होता. केंद्राच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या सहकाऱ्याने हा कार्यक्रम यशस्वी झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *