- Breaking News, अपघात, नागपुर समाचार

नागपूर/कन्हान समाचार : भाजपचे आमदार आशिष जयस्वाल यांच्या कारला अपघात; दोन ठार

नागपूर/कन्हान समाचार : भाजपचे आमदार आशिष जयस्वाल यांच्या कारला भीषण अपघात झाला. नागपूर जिल्ह्यातील कन्हान जवळ आमदार आशिष जयस्वाल यांच्या आणि अन्य एका वाहनांमध्ये जोरदार धडक झाली. बुधवारी (ता. 10) हा भीषण अपघात झाल्याची माहिती नागपूर ग्रामीण पोलिसांनी दिली.

कन्हान जवळ झालेल्या या अपघातामध्ये दोन जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. आमदार आशिष जयस्वाल यांचे स्वीय सहाय्यक देखील अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. अपघात घडल्यानंतर परिसरातील नागरिकांनी धावाधाव करीत वाहनांमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढले. मात्र तोपर्यंत दोन जणांचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच नागपूर पोलिसांनी कन्हानकडे धाव घेतली. हा अपघात इतका जबरदस्त होता की, दोन्ही कारच्या समोरील बाजू चकनाचुर झाल्या. अपघातग्रस्त दोन्ही वाहनांपैकी पांढऱ्या रंगाची कार रस्त्याच्या खाली फेकली गेली.

मोदींच्या सभेची तयारी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा बुधवारी (ता. 10) नागपूर जिल्ह्यात होत आहे. अशाच सभेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी मध्यरात्रीनंतर सभेच्या आयोजन स्थळी गेले होते. मुख्यमंत्र्यांसोबत यावेळी आमदार आशिष जयस्वाल देखील होते. परंतु त्यांच्या वाहनाला कन्हानजवळ अपघात झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *