नागपूर समाचार : श्री गजानन महाराज यांच्या प्रगट दिनाचे औचित्य साधून प्रसंगी गिरनार अर्बन क्रेडीट को-ऑप सोसायटीचे पारडी शाखेच्या स्वमालकीच्या इमारतीचे तसेच श्री गजानन महाराज बहुउद्देशीय शिक्षण संस्था द्वारा संचालित निःशुल्क श्री गजानन माऊली संगणक केंद्र (नूतनीकृत) व अभ्यासिकेचे उद्घाटन सोहळा आज रविवार दि. ०३ मार्च २०२४ रोजी संदीप पाटील IPS, पोलीस महानिदेशक (नक्षलविरोधी अभियान, महा राज्य), सुनील मेंढे, खासदार, भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्र, सहकार चळवळीचे शिरोमणी राज्य फेडरेशन चे अध्यक्ष मा. काकासाहेब कोयटे, आमदार कृष्णा खोपडे, पूर्व नागपूर, नागपूर जिल्हा पतसंस्था संघ व गिरनार पतसंस्थेचे अध्यक्ष मा. राजेंद्र घाटे व संपूर्ण कार्यकारी संचालक मंडळाचे सदस्य, पारडी परिसरातील प्रतिष्ठित नागरिक, माजी सेवक यांचे मोठ्या संस्थेने उपस्थितीत पार पडला. या प्रसंगी श्री गजानन महाराजांचे प्रगट दिनानिमित्य महाप्रसादाचे वितरण सुद्धा करण्यात आले.
याप्रसंगी राज्य फेडेरेशन यांनी आपले मार्गदर्शनात सांगीतले की, गिरनार पतसंस्थांचे कामकाज हे पतसंस्था चळवळीत अगदी दिपस्तंभाप्रमाणे आहे. नागपूर विभागात त्यांच्या कार्याचा गौरव करीत राज्य शासनाने सहकार निष्ठ पुरस्काराने पुरस्कृत केलेले आहे. महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र असलेल्या व मागील २२ वर्षापासून सतत अ’ वर्ग ऑडीट वर्ग प्राप्त असणाऱ्या गिरनार पतसंस्थेचा किमान १४५ कोटीचा संमिश्र व्यवसाय आहे. संस्थेचा जवळपास २५ कोटीचा स्वनिधी, संस्थेने ८२ कोटीच्या सभासद ठेवी पैकी ३८ कोटीची गुंतवणूक केलेली आहे. संस्थेचा CRAR २५.५२% इतका आहे. संस्थेच्या शाखा पारडी ला दि. १० डिसेंबर २००७ रोजी सुरू होवून अत्यल्प ठेवी व कर्जातून कामकाजाला सुरुवात झाली. आज तारखेस या शाखेला रु. २५ कोटीचे कर्ज व १८ कोटीचे सुमारास ठेवींचा आकडा गाठलेला आहे. शाखा सुरुवातीपासून नफ्यात आहे.
संस्थेचे केवळ आर्थिक व्यवसाय न करता सामाजिक बांधिलकी जोपासना अनेक समाजाभिमुख प्रकल्प राबवीत आहे. संस्थेचे माध्यमातून शववाहिनी, शवपेटी रुग्णवाहिका, संगणक प्रशिक्षण केंद्र, अभ्यासिका या सारखे नि: शुल्क राबवीत आहे. या कार्यक्रमाचे सूत्र संचलन सौ डिम्पल घाटे यांनी केले. संस्थेचे संचालक कर्मचारी व दैनिक प्रतिनिधीनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यात आपला सहभाग नोंदविला.