- Breaking News, धार्मिक , नागपुर समाचार

नागपूर समाचार : निर्मल नगरीत श्री संत गजानन महाराज प्रगटदिनोत्सव निमित्त पालखी सोहळा संपन्न

नागपूर समाचार : शेगांवचे प्रतिरूप श्री संत गजानन महाराज मंदिर, निर्मल नगरी, नागपूर येथे श्री संत गजानन महाराज प्रगटदिनोत्सव दि. २८ ते ३ मार्च या दरम्यान साजरा करण्यात येत आहे. शनिवार दि. २ मार्च रोजी दुपारी ४ वाजता पालखी सोहळयाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.

यामध्ये निर्मल नगरी, शितला माता मंदिर, सक्कधरा चौक, गजानन महाराज चौक, तिरंगा चौक, नंदनवन चौक, ईश्वर नगर चौक व निर्मन नगरी गजानन महाराज मंदिर, विविध ठिकाणी पालखीचे भव्य स्वागत करण्यात आले, यामध्ये भजन दिंडी, घोडा, बगीरथ, शेकडो भाविक सहभागी झाले होते. 

रविवार दि. ३ मार्च २०२४ ला सकाळी ६ वाजेपासून सामुहिक पारायणाचे आयोजन तसेच अभिषेक सकाळी ८ ते १० वाजेपर्यंत, महाआरती दुपारी ११ वाजता आणि गोपालकाला किर्तनाचे आयोजन दुपारी २ ते ४ वाजेपर्यंत केलेले आहे. महाप्रसादाचा कार्यक्रम सायं. ५.३० वाजेपासून करण्यात आलेला आहे. तरी सर्व भाविकांनी जास्तीत जास्त मोठया संख्येने उपस्थीत राहून सामुहिक पारायणाचा तसेच महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी विनंती सुनील बालपांडे दादा यांनी केली आहे व यांच्याच मोबाईल क्रमांकावर ९४२१२७९००९ संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *