- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : दिव्यांगांना सौरचलित ट्रायसिकलचे वितरण

नागपूर समाचार : दिव्यांगांना यापूर्वी ४० कोटी रुपयांचे साहित्य दिले होते. आज खासदार निधीतून ३५ दिव्यांगांना सौरऊर्जेवर चालणाऱ्या मोटराइज्ड ट्रायसिकल दिल्या. नागपूर शहरातील प्रत्येक दिव्यांगाचे जीवन सुसह्य करण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवार केले. समेकित क्षेत्रीय कौशल्य विकास, पुनर्वसन आणि दिव्यांग सशक्तीकरण केंद्र (सी.आर.सी.) यांच्या वतीने आणि विशाखापट्टणम येथील आंध्र प्रदेश मेड टेक झोन (एएमटीझेड) यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

एनरिको हाइट्स येथे पार पडलेल्या कार्यक्रमाला आ. मोहन मते, विकास कुंभारे, प्रवीण दटके, भाजपचे शहराध्यक्ष बंटी कुकडे, माजी आमदार डॉ. मिलिंद माने, जयप्रकाश गुप्ता, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती. येत्या काळात आणखी मोठ्या प्रमाणात या ट्रायसिकलचे वितरण करण्याचा प्रयत्न असल्याचेही गडकरी यांनी सांगितले.

अशी आहे मोटराइज्ड ट्रायसिकल

सौरऊर्जेवर ५ तासांमध्ये पूर्णपणे चार्ज होणाऱ्या या वाहनाचा वेग ताशी २३ किलोमीटरपर्यंत आहे. याशिवाय ४० किलोमीटरचा कमाल मायलेज देण्याची क्षमता यामध्ये आहे. अतिशय मजबूत रचना आणि संक्षिप्त स्वरूपातील मोटराइज्ड ट्रायसिकलमध्ये इलेक्ट्रिक ब्रेक कंट्रोल सिस्टमदेखील समाविष्ट करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *