- Breaking News, धार्मिक , नागपुर समाचार

नागपूर समाचार : मा.गडकरी यांच्या हस्ते शिवछत्रपती महाराजांना अभिवादन

◾देशात शिवाजी महाराजांचे नाव विश्वात एक नंबरच राहील पाहिजे : मा. नितीनजी गडकरी

◾पूर्ण दक्षिण नागपूर भगवामय : मंगला खेकरे

◾शिवाजी महाराजांचे स्मरण, नामस्मरण, प्रत्येक घराघरात करा: आ.मोहन मते

नागपूर समाचार : शिवजन्मोत्सव समिती दक्षिण नागपूर (मानेवाडा) बेसा रोड येथील परिवर्तन चौकात सोमवारी 19 फरवरीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सव साजरा करीत सर्वप्रथम गडकरी यांचे आगमन होताच जय शिवाजी, जय भवानी चा गजर ही गजर करित असतांना सर्वप्रथम शिवाजी महाराजांना मानवंदना व अभिवादन केले.

त्याप्रसंगी गडकरींनी जय भवानी जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, आणि भारत माता की जय, अशी घोषणा करित! नारे बाजे लावत जल्लोष ही जल्लोष यावेळी झाला होता. पूर्ण दक्षिण नागपूर भगवामय झाल्याचं दिसून येताचं गडकरींनी अखंड हिंदुस्थानातील शिवरायांना आपण आराध्य दैवत मानतो. आपल्या जीवनात आई -वडिलांना जसं आपण मानतो तसेच आपण शिवछत्रपती महाराजांना आराध्य दैवत मानतो. कार्यक्रमाप्रसंगी नितीनजी गडकरी यांनी शिवाजी महाराजांना अभिवादन करून त्यांनी केलेले कार्य, कर्तृत्व, नेतृत्व, व्यक्तित्व केलं असेच भविष्यात आपल्या समाजातून चांगलं कार्य करावे असं गडकरी म्हणाले.

शिवरायांचे पूर्ण जगात व आपल्या भारत देशात एक नंबरचं नाव व भविष्यातही राहिलं पाहिजे. आपल्या व समाजाच्या माध्यमातून ते पोहोचविण्याचे काम आपण केलं पाहिजे असे त्यांनी सांगितले. मंचावरील केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचे स्वागत व सत्कार शिवरायांची मूर्ति देऊन सौ. मंगलाताई खेकरे व शशांक खेकरे यांनी केले. दक्षिणचे आमदार मोहनभाऊ मतेचे स्वागत सत्कार व मूर्ती देऊन सौ. मंगलाताई खेकरे आणि शशांक खेकरे यांच्या तर्फे करण्यात आले. त्यावेळी मोहनजी मते यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण, नामस्मरण प्रत्येक घराघरात करावे. तसेच आपण एकत्रित येऊन शिवजयंती साजरी करावी हे सुद्धा त्यांनी सांगितले.

सरते शेवटी सौ. मंगलाताई यांनी पूर्ण दक्षिण नागपूर भगवामय … त्याचं कारण असं आहे की, हि संकल्पना मोहनभाऊ मते यांची होती म्हणून कार्यक्रम यशस्वी झाला. कार्यक्रमाचे संयोजक शंशांक खेकरे व मित्र परिवारानी केले. दुपारी झालेल्या वेशभूषा स्पर्धेतील बाल कलाकारांना व महिलां विजेत्यांना पारितोषिके वितरण करण्यात आले. कार्यक्रमाप्रसंगी मंचावरील केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, दक्षिणेचे आमदार मोहन मते, शहराध्यक्ष बंटी कुकडे, संजयजी भेंडे, सौ. मंगलाताई खेकरे आणि शशांक खेकरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. तसेच याप्रसंगी शंशांक खेकरे व मित्रपरिवार, कार्यकर्ते, पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *