- Breaking News, धार्मिक , नागपुर समाचार

नागपुर समाचार : उदय नगर चौकात शिवछत्रपती प्रतिष्ठान समिती द्वारा छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोहळ्याचे आयोजन

नागपूर समाचार : दक्षिण नागपूर मानेवाडा रिंग रोड येथील उदयनगर चौकात मुकेश रेवतकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या समोर रविवारी व सोमवार दिनांक 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी प्रतिष्ठान समिती द्वारा शिवाजी महाराजांच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे संपर्कप्रमुख आमदार दृष्यंत चतुर्वेदी, सुरेश साखरे, प्रमोद मानमोडे, दीपक कापसे, जयदीप पेंडके, राजेश वाघमारे, सुशीलाताई नायक, मंगला गवरे आणि रजनीताई चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती राहतील. त्याचबरोबर याप्रसंगी शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित राहतील.

रविवार दिनांक 18 फेब्रुवारी रोजी 10 ते 2 या दरम्यान 14 वर्षाच्या आतील चित्रकला स्पर्धेचे आयोजन त्यानंतर 4 ते 6 या दरम्यान 9 ते 14 वर्षासाठी शिवचरित्र्यावर सामान्य ज्ञान प्रश्नावली स्पर्धा आयोजित केली आहे. दुसऱ्या दिवशी सोमवारी 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची प्राणप्रतिष्ठा सोहळा कार्यक्रम सकाळी 8 वाजता करण्यात आले आहे.

सायंकाळी 5:30 वाजता शिवाजी महाराजांवर आधारित पोवाडा कार्यक्रम नंतर 6:30 वा. शिव गर्जना मानवंदना 7:00 वा. शिवाजी महाराज आणि आईसाहेब माँ जिजाऊ यांच्यावर आधारित 3 ते 8 वयोगट यात वेशभूषा स्पर्धा 7ः30 वाजता. स्पर्धकांचे बक्षीस वितरण आणि मान्यवरांचे स्वागत कार्यक्रम त्यानंतर रात्री 8 वाजता महाप्रसाद वितरण सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन मुकेश रेवतकर यांनी केले असून या प्रतिष्ठान सोहळ्यात शिवसैनिक गौरव तिजारे, शानु राऊत, अखिलेश भुगावकर, दुर्गेश काटगाये, लोकेश कुंभारे, यश ढोबाळे, शैलेश साठमोहनकर परिश्रम घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *