- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : दोन दिवसीय “राष्ट्रीय पर्यावरण युवा संसद” संपन्न

नागपूर समाचार : विकसार्थ विद्यार्थी द्वारा पर्यावरण गतिविधीच्या संयुक्त विद्यमाने नागपूर येथे दोन दिवसीय राष्ट्रीय पर्यावरण युवा संसद आयोजित करण्यात आली होती या पर्यावरण संसदेला देशभरातील विद्यापीठातील १६४ प्रतिनिधी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन राजस्थान विधानसभेचे अध्यक्ष डॉ. वासुदेव देवणानी यांच्या हस्ते करण्यात आले.

विकासार्थ विद्यार्थी विद्यार्थ्याला उद्याचा नाही तर आजचा विद्यार्थी आजचा नागरिक या संकलपनेला मानून पर्यावरण या दोन दिवसीय संसदे मधे जलवायू परिवर्तन, प्लास्टिक, नैसर्गिक संसाधनावर हानी अश्या अनेक अश्या अनेक विषयांवर लोकतान्त्रिक माध्यमातून चर्चा झाली. यामधील १० विद्यार्थ्यांना उत्तम वक्ता, उत्तम प्रधमंत्री, उत्तम विरोधी पक्ष नेता अश्या विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

यामध्ये विकासर्थ विद्यार्थी म्हणून जल संरक्षण या विषयाला घेऊन काम करेल अशी घोषणा विकासार्थ विद्यार्थी चे अखिल भारतीय संयोजक मयूर जव्हेरी यांनी केली. या राष्ट्रीय पर्यावरण युवा संसदेच्या समारोप कार्यक्रम प्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी प्रामुख्याने उपस्थित होते. केवळ स्वच्छता करून उपयोग नाही तर कचऱ्याचे रूपांतर संपत्तीत कसं करता येईल यावर युवकांनी विचार केले पाहिजे, ईथिक्स इकॉनॉमी, इकॉलॉजी या जीवनातील तीन मंत्रणान वर त्यांनी प्रकाश टाकला.

सुरत महानगरपालिकेची आयुक्त शालिनी अग्रवाल प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. सुरत शहरातील सर्व प्लास्टिक रोड मधे घालून पर्यावरण क्षेत्रात सुरत शहराला कसे अग्रसर केले जात आहे ते सांगितले. या कार्यक्रमा प्रसंगी मंचावर सेवार्थ विद्यार्थी चे राष्ट्रीय सह संयोजक शिल्पा कुमारी, प्रदेश मंत्री पायल कीनाके उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *