- Breaking News, नागपुर समाचार, स्वास्थ 

नागपुर/रामटेक समाचार : काचुरवाही येथे नि:शुल्क नेञ तपासणी शिबिर संपन्न

नागपुर/रामटेक समाचार : दिनांक ५ फरवरी २०२४ रोजी काचुरवाही ता.रामटेक येथे “आपला आमदार आपल्या सेवी अभियान” अंतर्गत अ‍ॅड.आशिष जयस्वाल आमदार वैद्यकीय व दिव्यांग सहाय्यता कक्ष तर्फे निःशुल्क नेत्र तपासणी, मोतिबिंदू तपासणी व मोफत चष्मे वाटप शिबिर काचुरवाही येथील समाज भवन येथे आयोजित करण्यात आले होते.

महात्मे हॉस्पिटल नागपुर येथिल तज्ञ डॉक्टर यांच्या द्वारे नागरीकांची नि:शुल्क नेञ तपासणी करण्यात आली. या शिबिरात एकूण-२५९ लाभार्थीनी लाभ घेतला. मोतिबिंदु ऑपरेशन करिता लाभार्थीं-६३ व चष्मे करिता-१९६ लाभार्थींनी. व तसेच आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी करिता-११३ लाभार्थीं यांनी लाभ घेतला.

या कार्यक्रम प्रसंगी सरपंच सौ.सविताताई सुभाषजी नागोसे, उपसरपंच श्री.अनिकेतजी घोल्लर, मीनाक्षीताई मोहनकार, श्री.चंदूजी बावनकुळे, श्री.नंदूजी नाटकर, उषाताई घोल्लर, श्री.रवीजी मोहनकर, किरणताई धुर्वे, श्री.विक्कीजी बावनकुळे, श्री.दिनेशजी चरडे, श्री.संतोषजी घोल्लर, श्री.संजयजी सूर्यवंशी, श्री.अक्षयजी साहरे, श्री.नरेंद्रजी भोगाडे, श्री.आकाशजी डोकरीमारे, श्री.ईश्वरजी मोहनकार, श्री.पिंटूजी सेलोकर, श्री.अमितजी सेलोकर, श्री.गंगाधरजी नाटकर, श्री.योगेशजी बावनकुळे, श्री.सुमित कामडे, श्री.निखिल कडू व तसेच समस्त गावकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

आमदार आशिष जयस्वाल यांनी “आपला आमदार आपल्या सेवी” अभियान अंतर्गत आमदार वैद्यकीय व दिव्यांग सहाय्यता कक्ष सुरु केलेला आहे.यामध्ये रामटेक विधानसभा मतदार संघातील लोकांसाठी ३६५ दिवस २४ तास वैद्यकीय मदत क्रमांक 7887883377 सुरु केलेला आहे.याद्वारे मुख्यमंञी सहाय्यता निधि,रुग्ण वाहिका सह विविध सुविधा पुरविल्या जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *