- Breaking News, धार्मिक , नागपुर समाचार

नागपूर समाचार : महिलांना सामाजिक, आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरणासाठी शासन प्रयत्नशील – प्रेम (हितेश) मुंदाफळे

नागपूर समाचार : मानेवाडा रोडवरील बजरंग नगर व बोधीवृक्ष नगर गल्ली नंबर ७ येथील स्त्रियांनी एकत्र येऊन एकजुटीने कार्य करण्यासाठी मकरसंक्रांती निमित्त व हळदीकुंकू कार्यक्रम सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी हळदीकुंकू व बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलां भगिनींना मार्गदर्शन करतांना प्रेम (हितेश) मुंदाफळे म्हणाले की, शासन आपल्या स्तरावर महिला भगिनींसाठी अनेक लोकापयोगी कार्य करीत आहे.

मग तो महिलांच्या सुरक्षेचा असो, महिलांच्या योजनेचा असो, महिला सक्षमीकरणाचा असो अशा विविध स्तरांवर शासन कार्य करीत असल्याची माहिती दिली. महिलांना सामाजिक, आर्थिक दृष्ट्या सक्षमीकरणासाठी शासन प्रयत्नशील आहे. केंद्र सरकारने महिलांसाठी राजकीय आरक्षण 33% करून महिलांचा सन्मान केलेला आहे. त्याचबरोबर राज्य सरकार च्यावतीने राज्यभरात महिला सक्षमीकरण कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून महिलांना व पुरुषांना समान अधिकार तसेच महिलांसाठी व पुरुषांसाठी एकाच छताखाली सर्व योजनांचा लाभ घेता येईल म्हणून राज्य सरकारने महिला सक्षमीकरण हा कार्यक्रम राबविलेला आहे. मुंदाफळे यांनी महिलांसाठी सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महिलांसाठी अनेक योजना राबविण्यात येत आहेत. असे प्रतिपादन बक्षीस वितरण व हळदी कुंकू स्नेहमिलन या कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रेम मुंदाफळे यांनी केले.

महिला भगिनींसाठी सुद्धा लाभदायक असून या योजनेत वाढ निश्चितच होईल असा विश्वास यावेळी व्यक्त करत सदर कार्यक्रमा बरोबरच हळदी कुंकू म्हणजे हिंदू संस्कृतीतील स्त्रियांसाठी एक सौभाग्याचं लेन या माध्यमातून महिलांनी कसलाही भेदभाव न ठेवता स्वतःला प्रगत करावे.

स्त्रियांनी एकमेकांचे मनोबल प्रयत्न करावे. यासाठी हळदी-कुंकु कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांनी एकजुट व्हावे. असे वक्तव्य करून मुंदाफळेनी महिलांना मार्गदर्शन केले. सत्कार समारंभ प्रसंगी मुंदाफळे यांना शाल श्रीफळ, पुष्पहाराने सन्मान करून सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमात महिलांनी संगीतखुर्ची, सिंगिंग आणि डॉन्स चा आनंद घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ.प्रिय मुंदाफळे तर आभार सौ.सारिका खडसे हिने मानले. यावेळी प्रामुख्याने मंचावर प्रेम (हितेश) मुंदाफळे, रमेश पिसे, अंचल वर्मा, सौ.प्रिया मुंदाफळे संचालिका सारिका खडसे सौ. कविता हिंगणकर मोठ्या संख्येने महिला भगिनी उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *