- Breaking News, नागपुर समाचार, विदर्भ, स्वास्थ 

रामटेक समाचार : कट्टा येथे नि:शुल्क नेञ तपासणी शिबिर संपन्न

रामटेक समाचार : दिनांक ३० जानेवारी २०२४ रोजी कट्टा ता. रामटेक येथे “आपला आमदार आपल्या सेवी अभियान” अंतर्गत अ‍ॅड.आशिष जयस्वाल आमदार वैद्यकीय व दिव्यांग सहाय्यता कक्ष तर्फे निःशुल्क नेत्र तपासणी, मोतिबिंदू तपासणी व मोफत चष्मे वाटप शिबिर कट्टा येथील जिल्हा परिषद शाळा येथे आयोजित करण्यात आले होते.

महात्मे हॉस्पिटल नागपुर येथिल तज्ञ डॉक्टर यांच्या द्वारे नागरीकांची नि:शुल्क नेञ तपासणी करण्यात आली. या शिबिरात एकूण-११३ लाभार्थीनी लाभ घेतला. मोतिबिंदु ऑपरेशन करिता लाभार्थीं-२४ व चष्मे करिता-८९ लाभार्थींनी तसेच आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी करिता-३९लाभार्थी यांनी लाभ घेतला.

या कार्यक्रम प्रसंगी मा.पं.स.सभापती श्री.संजयजी नेवारे, श्रीविजयजी वरटी , श्री.सेवकरामजी भलावी, श्री.विशालजी वरटी, श्री.बोरकनाथजी भलावी, श्री.चंद्रभानजी वरटी, श्रीकांतजी खंडाते, श्री.सुमित कामडे, श्री.निखिल कडू व तसेच समस्त गावकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

आमदार आशिष जयस्वाल यांनी “आपला आमदार आपल्या सेवी” अभियान अंतर्गत आमदार वैद्यकीय व दिव्यांग सहाय्यता कक्ष सुरु केलेला आहे.यामध्ये रामटेक विधानसभा मतदार संघातील लोकांसाठी ३६५ दिवस २४ तास वैद्यकीय मदत क्रमांक 7887883377 सुरु केलेला आहे.याद्वारे मुख्यमंञी सहाय्यता निधि,रुग्ण वाहिका सह विविध सुविधा पुरविल्या जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *