- Breaking News, नागपुर समाचार

नागपुर समाचार : पशुधन टॅगिंग व नोंदणीस शेतक-यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नागपूर समाचार : पाच जानेवारी रोजीच्या शासन निर्णयानुसार दूध उत्पादक शेतकऱ्यांना गाय दुधासाठी प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देय आहे. पात्र पशुधनास कानात टॅगिंग करून भारत पशुधन प्रणालीमध्ये नोंदणी अत्यावश्यक असणार आहे. त्यानुषंगाने सर्व पशुवैद्यकीय संस्था मार्फत पशुधनास टॅगिंग व भारत पशुधन प्रणालीवर नोंदणी प्रक्रिया सुरू असल्याचे पशुसंवर्धन विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

पशुधनास टॅगिंग व नोंदणीस शेतकरी, पशुपालक यांच्याकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आजअखेर खालीलप्रमाणे अतिरिक्त नोंदणी करण्यात आल्या आहेत. पशुधन नोंदणी ५.७३ लक्ष, पशुपालक नोंदणी १.९६ लक्ष, पशुपालक हस्तांतरण नोंदणी ३.२० लक्ष, पशुधनाच्या नोंदीत बदल १.८४ लक्ष, कानातील टॅग बदल नोंदी, ५ हजार ७९५ पशुपालकाच्या नावातील बदल करण्यात आले आहेत.

सर्व पशुधनास tagging व online नोंदणीसाठी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क करुन आपल्या पशुधनाची नोंदणी प्रक्रीया पूर्ण करावी. शासन निर्णय दि. ०५.०१.२०२४ नुसार नागपूर जिल्हातील एकूण ४ दूध प्रकल्पांनी पाच रुपये अनुदानाकरीता सहभाग घेतला आहे.

जिल्हा पडताळणी समिती, नागपूरमार्फत जिल्हातील सर्व पात्र पशुपालक, शेतकरी यांना आवाहन करण्यात येते की दूध उत्पादक शेतकऱ्यांनी पाच रुपये अनुदानाचा लाभ घेण्यास्तव पशुधन टॅगिंग विषयी आवश्यक कार्यवाहीसाठी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी अथवा जिल्हास्तरीय समितीशी संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *