- Breaking News, खासदार क्रीड़ा महोत्सव, नागपुर समाचार

नागपूर समाचार : खासदार क्रीडा महोत्सव 2024; कॅरम स्पर्धेत राजू भैसारे केवल मेश्रामला आघाडी

नागपूर समाचार  : केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील कॅरम स्पर्धेमध्ये बुधवारी (ता.24) झालेल्या दुस-या फेरीत राजू भैसारे, केवल मेश्राम यांच्यासह अन्य खेळाडूंनी आघाडी घेतली आहे.

उत्तर नागपूर क्रीडा संकुल अहुजा नगर येथे बुधवारी झालेल्या पुरूष एकेरीतील दुस-या फेरीमध्ये एजीआरसीच्या राजू भैसारेने पहिल्या दिवशी विजय संपादित केलेल्या सन्नी चंद्रीकापूरेला 22-4, 25-20 अशी दोन सेटमध्ये मात देत विजय मिळविला. प्रौढ गटातील दुस-या फेरीत एनकेएम च्या केवल मेश्रामने मकरंद बक्षीचा 23-9, 18-9 असा पराभव करीत विजय मिळविला.

महिलांच्या सामन्यात एकेरीमध्ये पौर्णिमा पराळे ने पीजीव्ही च्या श्रेया मुदवालेला 25-0, 25-0 अशी एकतर्फी मात देउन विजय मिळविला. अन्य सामन्यामध्ये दिप्ती निशाद ने दविका मगदुमवार चा पराभव केला. जनताच्या पुष्पलता हेडाउ ने 21-0, 15-0 असा एकतर्फी पीजीव्हीच्या आर्या जैन पराभव करून स्पर्धेत आव्हान कायम ठेवले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *