- Breaking News, खासदार क्रीड़ा महोत्सव, नागपुर समाचार

नागपूर समाचार : खासदार क्रीडा महोत्सव 2024; थ्रोबॉल स्पर्धेत‌ सेंट जोसेफ, प्रोव्हिडन्सला विजेतेपद

खासदार क्रीडा महोत्सव 2024; थ्रोबॉल स्पर्धेत‌ सेंट जोसेफ, प्रोव्हिडन्सला विजेतेपद

नागपूर. खासदार क्रीडा महोत्सवातील थ्रोबॉल स्पर्धेमध्ये 17 वर्षाखालील मुलींच्या गटामध्ये सेंट जोसेफ आणि प्रोव्हिडन्स संघाने पूल ‘ए’ आणि पूल ‘बी’ गटातून विजेतेपद पटकाविण्याची कामगिरी केली.

दिघोरी येथील बिसरा मैदानामध्ये ही स्पर्धा सुरू आहे. बुधवारी (ता.24) 17 वर्षाखालील मुलींच्या पूल ‘ए’ गटात सेंट जोसेफ संघाने सीडीएस संघाचा 17-16, 15-07, 15-12 असा तीन सेटमध्ये पराभव करून विजेतेपदावर नाव कोरले. तर पूल ‘बी’ गटात प्रोव्हिडन्स संघाने सेंट उर्सुला संघाला 15-3, 15-5 अशी मात देत स्पर्धेचे जेतेपद पटकाविले.

पूल ‘ए’च्या उपांत्य फेरीमध्ये सेंट जोसेफ संघाने व्हीएनसी संघाचा 15-1, 15-6, 12-15 असा पराभव करून अंतिम फेरीत स्थान निश्चित केले होते. तर सीडीएस संघाने ई पाठशाला संघाला 11-15, 15-13, 15-3 ने पराभवाचा धक्का देत सेंट जोसेफ संघाचे आव्हान स्वीकारले होते. पूल ‘बी’ मध्ये प्रोव्हिडन्स संघाने ई पाठशालाचा 15-02, 15-03 ने तर सेंट उर्सुला संघाने एस.ओ.एस ला 15-12, 15-11 ने मात देत अंतिम फेरी गाठली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *