- Breaking News, PRESS CONFERENCE, धार्मिक , नागपुर समाचार

नागपूर समाचार : मारुती देवस्थान ट्रस्ट, श्रीराम सेवा समिती, रामदासपेठ तर्फे आयोजित भव्य

नागपूर समाचार : मारुती देवस्थान ट्रस्ट, श्रीराम सेवा समिती तर्फे आयोजित श्रीमद् जगदगुरु रामानुजाचार्य स्वामी अनंताचार्याजी महाराज, वृंदावन यांच्या द्वारे प्रस्तुत भव्य संगीतमय श्री राम कथा ज्ञानयज्ञ चा कार्यक्रम १६ जानेवारी ते २० जानेवारी २०२४ पर्यंत दुपारी ३ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत “अयोध्या धाम” लेंड्रा पार्क, रामदासपेठ येथे आयोजित केला आहे.

श्री राम कथा ज्ञानयज्ञ थी शोभायात्रा १६ जानेवारीला सकाळी १० ते १ पर्यंत नवदुर्गा माता मंदिर, काछिपुरा पासून सुरु होईल. या राम कथेत श्री राम जन्माचा उद्देश तसेच श्री रामचरितमानस चे दर्शन, श्रीराम जन्म व त्यांची बाल लिला, विश्वामित्र यज्ञ संरक्षण आणि धनुष्य यज्ञ, मिश्रीला पुरी प्रवेश आणि श्रीराम जानकी विवाह, श्रीराम राज्याभिषेक ह्या विषयांवर महाराज कथाकथन करतील, श्रीराम कथेचे उद्घाटन जगदगुरु रामानंदाचार्य स्वामी श्री रामराजेश्वराचार्यजी, पीठाधीश्वर, श्री रुख्मिणी पीठ यांच्या शुभ हस्ते संपन्न होईल तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रसिद्ध उद्योगपती सत्यनारायण नुवाल प्रमुखतेने उपस्थित राहतील. या राम कथेचे मर्म आत्मसात करून कार्यक्रमास तन, मन, धनाने सहकार्य करावे असे आवाहन आयोजन समिती तर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *