- नागपुर समाचार, विदर्भ

चंद्रपूर समाचार : भद्रावती शहरात मध्यरात्री घराच्या अंगणात दिसला ठाण मांडून बसलेला बिबट्या

चंद्रपूर समाचार : भद्रावती शहरातील मल्हारी बाबा सोसायटी येथे काल रात्री तीनच्या दरम्यान घरातील अंगणात बिबट्यांनी बस्तान मांडले होते. ही घटना घरच्यांच्या लक्षात येताच त्यांनी घरात लावलेले सीसीटीव्ही फुटेज बघितले असता बिबट्याच्या संपूर्ण हालचाली त्यात कैद झाल्या होत्या. मल्हारी बाबा सोसायटी हा परिसर खापरी, पिपर बोडी या परिसराला लागून असून त्यातच त्याच्या बाजूला आयुध निर्माणीचे जंगल आहे. या परिसरात बिबट्यांचा तसेच पट्टेदार वाघासह इतर वन्य प्राण्यांचा नेहमीच धुमाकूळ असतो.

गेल्या काही महिन्यांपूर्वी येथील एका विहिरित बिबट पडल्याची घटना घडली होती. काल रात्री तीनच्या दरम्यान येथील दीपक बच्चन यांच्या घरात कुत्र्यांच्या शोधात बिबट्या आला होता. त्याचा आवाज लक्षात घेता घरातील लोक जागे झाले व त्यांनी घरातील मुख्य दरवाजा उघडण्यापूर्वी घराच्या बाहेरील लावलेले सीसीटीव्ही फुटेज बघितले असता त्यात बिबट्याच्या पूर्ण हालचाली कैद झाल्या आहे. या घटनेने या परिसरातील नागरिकांमध्ये दहशत असून या घटनेची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी स्वाती म्हैसेकर यांना दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *