- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : ‘विकसित भारत संकल्प यात्रे’च्या माध्यमातून शासकीय योजना घरोघरी; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नागपूर समाचार : केंद्र शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ वंचित घटकापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने “विकसित भारत संकल्प यात्रा” सध्या जालना जिल्ह्यात सुरु आहे. या यात्रेच्या माध्यमातून शासनाच्या लोकल्याणकारी योजनांची मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. शासकीय योजना गावागावांत नेणाऱ्या या “विकसित भारत संकल्प यात्रे” ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

जिल्हात विविध ठिकाणी चित्ररथ नेण्यात येत आहेत. या माध्यमातून विविध योजनांची माहिती देण्यात येत आहेत. यात अलीकडेच ग्रामपंचायत हत्तीसर्रा तालुका सावनेर, ग्रामपंचायत चाफेगडी, ब्राह्मणी ग्रामपंचायत कामठी, ग्रामपंचायत मासोद, ग्रामपंचायत नांदागोमुख, जाईतपूर या ठिकाणी विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ नेण्यात आला. यास नागरिकांनी विविध योजनांची माहिती घेतली.  

विकसित भारत संकल्प यात्रेस ग्रामीण भागात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. या यात्रेच्या माध्यमातून नागरिकांना विविध योजनांचा लाभ मिळणार आहे. यात शिक्षणापासून ते आरोग्यापर्यत, स्वयंरोजगारापासून कृषीपर्यंत विविध योजनांचा समावेश आहे. या विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान विविध योजनांचा नागरिकांनी अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *