- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : सिंबायोसिस स्कूल ऑफ प्लॅनिंग आर्किटेक्चर अँड डिझाईन च्यावतीने औद्योगिक चर्चासत्राचे आयोजन संपन्न

नागपुर समाचार : सिम्बायोसिस स्कूल ऑफ प्लॅनिंग आर्किटेक्चर अँड डिझाईन, नागपूरच्या संचालिका डॉ. नंदिनी कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली कॉलेज च्या ट्रेनिंग आणि प्लेसमेंट विभागातर्फे नुकतंच इंडस्ट्री- अकॅडेमिया कॉन्क्लेव्ह चे आयोजन दि.२० नोव्हेंबर २०२३ रोजी संकरित स्वरूपात करण्यात आले होते.

ह्या आयोजनात संशोधन आणि सर्जनशील विचारधारा ह्यामधील अंतर एकत्रित प्रयत्नांद्वारे कमी करून विद्यार्थ्यांना डिझाईनच्या व्यावसायिक क्षेत्रात कसा प्रवेश करता येईल ह्यावर विचारमंथन करण्यात आले. सदर कॉन्क्लेव्हच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी संयुक्त अनुदान ओळखणे, सामंज्यस्य करारांवर स्वाक्षऱ्या करणे, विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिप तसेच रोजगाराच्या संधी निर्माण कशा होतील ई विषयांवर भर देण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. पराग व्यास (ग्राऊ बार डिझाईन, इंदोरचे संस्थापक आणि प्रमुख) यांना पाचारण करण्यात आले होते. इतर पाहुण्यांमध्ये डॉ. दक्ष केडिया, (भारती विद्यापीठातील ओरल आणि मॅक्सिलोफेशियल सर्जन आणि इम्प्लांटोलॉजिस्ट, दंत महाविद्यालय आणि रुग्णालय, पुणे), मनीष केडिया (बायोमेड मंथन येथे चार्टर्ड बायो-मेडिकल अभियंता) हरीश झांबानी आणि आर्किटेक्ट सविता मोखा, नागपूर यांचा समावेश होता.

ऑनलाइन पॅनेल च्या पाहुण्यांमध्ये मनभवन कुमार, सीओओ-पर्सिस्टंट सिस्टम्स, विवेक बांगडे-एफआरडीसी, बेंगळुरू, सौम्या अग्रवाल, मीशो येथील उपयोगिता विश्लेषक आणि बंगलुरू येथील नील उमरीगर, मोबिलिटी डिझाइनर ओला ह्यांचा समावेश होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *