नागपूर समाचार : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांना प्रेरित असलेले महाराष्ट्र प्रदेश राज्य उपाध्यक्ष, अध्यक्ष संघटक नागपूर व्यापारी सेना, उपाध्यक्ष नागपूर शहर तुषारभाऊ गिऱ्हे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात युवकांचा व महिलांचा पक्षप्रवेश व पदग्रहण सोहळा संपन्न झाला.
कार्यक्रमाचे मुख्य संचालन हर्षद दसरे यांनी केले. प्रमुख उपस्थिती महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष किशोर सरायकर, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष वाहतूक सेना सचिन धोटे नागपूर शहराचे शहराध्यक्ष विशाल बडगे व चंदू लाडे, शहर सचिव घनश्यामजी निखाडे व श्याम पुनियानी, शहर सहसचिव गौरव पुरी, पूर्व विभाग अध्यक्ष उमेश उतखेडे, अभिषेक माहुरे व इतर मान्यवर कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित होते.