- Breaking News, PRESS CONFERENCE, नागपुर समाचार

नागपुर समाचार : ‘गुणवैभव’ या व्यक्तीचरित्राचा “गुण वैभव” पुस्तकाचे प्रकाशन रविवारी

नागपूर समाचार : राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे कोषाध्यक्ष गुणेश्वर आरीकर गेल्या तीन दशकांपासून विदर्भात सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. गेल्या तीन दशकात गुणेश्वर आरीकर यांनी अनेक सामूहिक विवाहाच्या माध्यमातून गोरगरीब लोकांना सहाय्य केले आहे. गुणवंत विद्यार्थ्यांचे विदर्भात सर्व दूर त्यांनी कौतुक केले, त्यासाठी सोहळ्या आयोजित केले. गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या आंदोलनात राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांच्या खांद्याला खांदा लावून गुणेश्वर आरीकर हे महासंघाचे काम करत आहेत.

गडचिरोली जिल्ह्यातल्या मार्कंडा देवस्थान परिसरात असलेल्या श्री संत जीवनदास महाराज महाराष्ट्र चे गुनेश्वर आरीकर सचिव असून दरवर्षी लाखो येणाऱ्या भाविकांना अन्नदानाचा पुढाकारही त्यांच्या वतीने घेतला गेला आहे. अशा या सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व्यक्तिमत्त्वाच्या कार्याचा गौरव व्हावा गुणेश्वर आरीकर त्यांच्या मित्र परिवाराने पुढाकार घेत त्यांच्यावर विशेष अंक काढायचे ठरवले. यासाठी ‘गुणवैभव’ या व्यक्तीचरित्राचा गुण वैभव या पुस्तकाचे प्रकाशन “गुणेश्वर आरिकर गुणगौरव समितीच्या” वतीने रविवार दिनांक २४ डिसेंबर रोजी, सकाळी १०:३० वाजता संताजी सांस्कृतिक सभागृह सोमवारी कॉर्टर, बुधवारी बाजार, नागपूर येथे गुणवैभव या पुस्तकाचे विमोचन करण्यात येत असून या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष प्रबोधनकार भाऊसाहेब थुटे (सप्त खंजिरी वादक ) यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख अतिथी पाहूणे डॉ.परिणय फुके, आमदार मोहनजी मते, आमदार अभिजीत वंजारी, आमदार कृष्णाजी खोपडे, माजी आमदार सुधाकर कोहळे, दीनानाथ पडोळे, देवरावजी रडके, गिरिश पांडव, प्रेमभाऊ झाडे, माजी नगराध्यक्ष वाडी आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या कार्याध्यक्षा श्रीमती शरयुताई बबनराव तायवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम होणार असून या सर्व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते गुणवैभव या पुस्तकाचे विमोचन करण्यात येईल.

श्री संत तुकाराम महाराज क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड हुडकेश्वर ता.जि.नागपूर, विदर्भ खैरे कुणबी समाज संघटना महाराष्ट्र, श्री संत जीवनदास महाराज ट्रस्ट तहसील चामोर्शी जिल्हा गडचिरोली, रिफ्रेश व्यसनमुक्ती केंद्र नागपूर आणि वेंकटेश बिल्डर्स लँड डेव्हलपर्स नागपुर यांच्या सौजन्याने कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

संपादकीय मंडळामध्ये डॉ. प्रदीप महाजन, विनोद उलीपवार, डॉ.बळवंत भोयर, टेमराज माले, भैय्याजी रडके, संजय रंदळे, रामरतन देशमुख, माधुरी आरिकर, सुरेश वांढरे, विनोद आरिकर, अरुण तांगडे, आणि राहुल पाटील यावेळी उपस्थित राहतील. कार्यक्रमाचे संचालन प्रा.डॉ.नरेंद्र आरेकर आणि अरुणाताई भोंडे करतील. अभिष्ट चिंतन सोहळ्यात कुही, भिवापूर, उमरेड, नागपूर, राळेगाव, वर्धा, वरोरा, चंद्रपूर, राजुरा, गडचिरोली, अमरावती, भंडारा, मुल, हिंगणघाट, बल्लारशा या प्रकाशन समारंभात सहभाग राहील. असे पत्रपरिषदेत आयोजकांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *