नागपूर समाचार : प्रधानमंत्र्यांचे संबोधन, लाभार्थ्यांचे प्रत्यक्ष अनुभव कथन आणि ‘ड्रोन ’ व अन्य योजनांचे प्रात्यक्षिक नागपूर महानगर व जिल्ह्यातील आजच्या विकसित भारत संकल्प यात्रेचे वैशिष्टय ठरले. 2047 पर्यंत भारत विकसित राज्य बनविण्याच्या संकल्पाला यावेळी भरगच्च उपस्थितीतील नागरिकांनी उचलून धरले. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 8 तालुक्यात हा अविष्कार बघायला मिळाला.
आज 16 डिसेंबर 2023 रोजी पंचायत समिती नरखेड अंतर्गत सावरगाव येथे आयोजित विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर तर पंचायत समिती रामटेक अंतर्गत मौजा नगरधन येथील आयोजित कार्यक्रमात मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा उपस्थित होत्या. या कार्यक्रमांमध्ये दुपारी चार वाजता प्रधानमंत्री यांच्या लाईव्ह कार्यक्रम गावातील उपस्थित नागरिक पदाधिकारी यांना दाखवण्यात आला. या कार्यक्रमास माजी आमदार डी एम रेड्डी, दूधरामजी सव्वालाखे जिल्हा परिषद सदस्य सतीशजी डोंगरे, नरेंद्रजी बंधाटे , रामटेक पंचायत समिती सभापती अस्विताताई बिरणवार, पंचायत समिती सदस्य, नगरधन सरपंच, उपसरपंच व इतर पदाधिकारी तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
17 डिसेंबरला जिल्ह्यातील 6 तालुक्यात हिंगणा-धानोली, वडगाव, सावनेर – पोटा चिंचोली, भिवापूर – भिवी, पांजेपार, काटोल- र्सिसीवाडी, पानवाडी, रामटेक कट्टा, टांगला व मोदा- अदासा, निहारवाणी येथे विकसित भारत संकल्प यात्रा जाणार आहे.
विविध योजनांतर्गत पात्र असलेल्या परंतु आतापर्यंत लाभ न घेतलेल्या लोकांपर्यंत पोहचणे, महितीचा प्रसार आणि योजनांबद्दल जागरुकता निर्माण करणे, नागरिकांशी संवाद – वैयक्तिक अनुभव शेअरिंगव्दारे सरकारी योजनांचा लाभार्थ्यांशी संवाद साधणे, यात्रेदरम्यान निश्चित केलेल्या तपाशिलांव्दारे संभाव्य लाभार्थ्यांची नोंदणी करणे आदि या यात्रेची उद्दिष्टे आहेत.
या मोहिमेत आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड, आरोग्य तपासणी शिबिर, मृदा(सॉईल) आरोग्य शिबिर, महिला, विद्यार्थी व खेळाडूंना सन्मानित करणे इत्यादि उपक्रमांची अंमबजावणी करण्यात येत आहे.
मोहिमेची नागपूर जिल्हयात प्रभावीपणे अंमलबजावणी, सनियंत्रण, समन्वय, माहिती संकलन, योग्य पध्दतीने सूरु आहे. नागपूर जिल्हयात जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे अध्यक्षतेखाली 20 नोव्हेंबरच्या आदेशान्वये जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून या समितीमध्ये केंद्र व राज्य शासनाकडील अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सदर मोहिमेची माहिती नागरिकांना अवगत होण्यासाठी नागपूर जिल्हयाच्या ग्रामीण भागासाठी 6 व्हॅन प्राप्त झालेल्या आहेत. नागपूर जिल्हयातील सर्व ग्राम पंचायतींमध्ये ग्रामपंचायत स्तरावर समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत. विकसित भारत संकल्प यात्रेस जिल्ह्यात उत्सफूर्त प्रतिसाद लाभत आहे.