- Breaking News, नागपुर समाचार, विदर्भ

हिंगणघाट समाचार : हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील शेकडो युवा कार्यकर्त्यांचा भाजपा व युवा मोर्चा मध्ये प्रवेश

हाइलाइट..

  • आ. समिर कुणावार यांचे प्रमुख उपस्थितीत पक्ष प्रवेश सोहळ्याचे आयोजन
  • युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अंकुश ठाकूर व ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव रवी उपासे यांच्या नेतृत्वात पक्षप्रवेश

हिंगणघाट समाचार : हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात दिवसेंदिवस भाजपाचा मोठया प्रमाणात विस्तार होत असून विधानसभा क्षेत्रातील नागरीक तसेच युवा कार्यकर्ते आ.समिर कुणावार यांचे नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत मोठया प्रमाणात भारतीय जनता पक्षात प्रवेश करीत आहेत.

काल दि.०२ रोजी हिंगणघाट, समुद्रपुर, सिंदी (रेल्वे) विधानसभा क्षेत्रातील मांडगाव व वाघोली सर्कलच्या तसेच विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी आ. समीर कुणावार यांचा विधानसभा क्षेत्रातील लोकाभिमुख विकास तसेच कार्यसम्राट आमदार यांची कार्यशैली पहाता मोठ्या संख्येने भाजपात व भारतीय जनता युवा मोर्चामध्ये प्रवेश केला.

सदर प्रवेश सोहळा काल दि. ०२ रोजी आ. समीर कुणावार यांच्या स्थानिक जनसंपर्क कार्यालयात प्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले,याप्रसंगी प्रामुख्याने विवेक तडस , अनंत नागोसे, राजेंद्र डगवार ,सुरेश रोगे ,हरि रोगे, विठ्ठल तडस, देविदास जीवतोडे, मनोहर रघाटाटे, रामदास तडस, निर्भय अवचट, गंगाधर देशमुख, जीवन बुरांडे, रामराव झाडे, एम डी भोयर, वसंतराव ढोले, संजय बकाने, मनोहर कोरेकर, सुधाकर सोनटक्के, लक्ष्मणराव गुजरकर, सुयोग काथवटे ,कृष्णा गुळघाने, विठ्ठल रोहनकर, विठ्ठल वाघमारे, योगराज तडस, गजानन ठाकरे, काशिनाथ भानुसे, राहुल बालपांडे, अशोक रेवतकर, नितीन येवले, अनिकेत अमल्लेवार , अमित इंगळे, रामभाऊ शंकरराव, बाळा जोगे, निलेश तडस ,अतुल वांदिले, श्रीकांत पिसे, अर्जुन तडस, अक्षय तडस, स्वप्नील तडस, तसेच वाघोली सर्कलमधील युवा मोर्चाचे कार्यकर्ता सागर डफ, अमोल किनकर, गोलू वैतागे, अमोल शहारे ,नरेश कळसकर, आयुष खेरे, पियुष महाकाळकर, शुभम खेरे, अभय वाभळे, सागर नारनवरे, अक्षय गहुकर, दैनिक वाटमोडे ,सुरज वाबळे ,गणेश खेरे, हर्षल बुरांडे, रवी येनुरकर, प्रवीण ढगे, कार्तिक बुरांडे इत्यादी कार्यकर्त्यांना भाजपात तसेच युवा मोर्चा मध्ये रीतसर प्रवेश देण्यात आला. उपरोक्त प्रवेश सोहळा आमदार समीर भाऊ कुणावार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

सदर कार्यक्रमाचेवेळी कार्यसम्राट आ. समीर कुणावार यांचेसह अनुसूचित जमाती मोर्चा महाराष्ट्र प्रदेश महामंत्री नितीन मडावी, भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अंकुश ठाकूर, ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिव रवी उपासे , भाजपा जिल्हा महामंत्री आकाश पोहाणे, भाजपाचे हिंगणघाट तालुकाध्यक्ष विनोद विटाळे, भाजपा हिंगणघाट शहर अध्यक्ष भूषण पिसे, माजी नगरपरिषद बांधकाम सभापती शुभांगी डोंगरे ,माजी नगरपरिषद स्वास्थ सभापती सोनू गवळी, समाजसेवक सुनील डोंगरे, विठु बेनीवार, विवेक तडस ,अनंत नागोसे, खुशाल वेले ,अक्षय थुटे, कवी भट, प्रमोद नौकरकर, गौरव तांबोळी, विलास अंबरवेले, सनी बासनवार इत्यादी भाजपा व युवा मोर्चाचे पदाधिकारी तसेच जेष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *