नागपूर समाचार : ज्येष्ठ नागरिकांना सकाळ संध्याकाळ फिरायला किंवा काही कामानिमित्त बाहेर पडायचे झाल्यास, आज शहरातील एकही रस्ता सुरक्षित राहिलेला नाही. अर्ध्याअधिक रस्त्यावर अतिक्रमण दिसून येते, एकही फुटपाथ रिकामा नाही. त्यामुळे ज्येष्ठ जनांची अत्यंत कुचंबना होत आहे. म्हणून ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षित आणि मोकळे रस्ते द्या, अशी मागणी ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानचे सचिव डॉ राजू मिश्रा यांनी केली आहे.
ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानच्या ज्येष्ठ नागरिक मंडळं समन्वय समितीच्या सभेत डाॅ राजू मिश्रा बोलत होते. कळमेश्वर बायपास रोडवरील घोगली गावा लगतच्या गिरीषा ॲग्रो टुरिझम फार्म येथे समन्वय समितीची सभा पार पडली. त्यात वरील मागणी करतांना डाॅ मिश्रा म्हणाले की मोकळ्या फुटपाथ वरून सुरक्षित फिरणे हा ज्येष्ठ नागरिकांचा अधिकार आहे. असे मोकळे फुटपाथ ज्येष्ठांना उपलब्ध करून देणे हे सरकार आणि प्रशासनाने कर्तव्य आहे, त्या कर्तव्याचे पालन संबधित विभागाने करावे, असेही ते पुढे म्हणाले.
मोकळे फुटपाथ मिळावे या मागणीसाठी लवकरच सर्व संबधित प्रशासकीय विभागांना मागणीचे निवेदन देण्यात येणार आहे आणि वेळ पडल्यास उच्च न्यायालयाकडे सुध्दा दाद मागितली जाईल, असे सांगून डाॅ मिश्रा पुढे म्हणाले की सध्या आम्ही नागपुरातील ज्येष्ठ नागरिकाच्या या करिता स्वाक्षऱ्या गोळा करित आहोत.
सभेच्या प्रारंभी गिरीषा फार्म प्रोजेक्टचे संचालक सतीश मोहोड यांनी प्रोजेक्टची माहिती दिली . नंतर सभेला सुरूवात झाली. त्यात ज्येष्ठ नागरिकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्या आली. समन्वय समितीचे सदस्य दिलीप कातरकर, हेमंत अंबरकर, गोविंद पटेल, नानासाहेब समर्थ, अरूण भुरे, सत्यनारायण राठी, बिपीन तिवारी, सुनील अडबे, दिपक शेंडेकर, सुरेश तन्नीरवार, श्रीराम दुरुगकर , पुरूषोत्तम पेटकर, मिलिंद वाचणेकर, विजय बावणकर, हिम्मत जोशी,वासुदेवसिंग निकुंभ, पुष्पाताई देशमुख, मंगला गावंडे, मीनाताई झंझोटे, राजवंती देवडे, कालिंदीनी ढुमणे, माधुरी पाखमोडे, वंदना वारके, राखी खेडिकर, यांच्यासह पाहूणे म्हणून डॉ अरूण आमले आणि सामाजिक कार्यकर्त्यां ज्योती द्विवेदी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.



