
नागपुर समाचार : प्रभागातील उदय नगर रोड वर शनिवार ला अवैद्यरित्या बाजार भरतो, या बाजाराने परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहे, पार्किंग, कचरा, आवाज, आणि बाजारात येणार लोक घरा समोर लघवी करतात, घान करतात, टवाळकी मूल दारू पितात अश्या कित्तेक समस्या या बाजारा मुळे येथील नागरिकानां सहन कराव्या लागतात.
मनपा आयुक्त मुंढे यांनी काही महीने पूर्वी बाजार बंद ची देखाव्या ची कार्यवाही केली होती, पण पुन्हा बाजार सुरु झाले आणि मुंढे साहेब या वर काही करु नाही शकले.
नागरिकांनी प्रभागच्या नगरसेविका सौ रुपाली परशु ठाकुर यांना दिनांक 25 जून लेखी निवेदन दिले. या वर काल शनिवारी 27 जून ला सर्व नागरिकांच्या सोबत नगरसेविका सौ रुपाली ठाकुर यांनी रस्त्या वर फिरून बाजार बंद केले, तसेच बजारातील भाजी विक्रेत्याचे ही एकूण घेतले, या वेळी mnc हनुमान नगर झोन च्या सहाय्यक आयुक्त मांडगे मैडम याच्या सोबत सुद्धा फोन वर बोलने केले.
अवैध बाजाराने नागरिक त्रस्त आहेत, आणि भाजी विक्रेत्याचे पन उदरनिर्वाह या वर अवलंबून आहे, त्या मुळे त्यांना सुद्धा योग्य जागा मनपा ने दिली पाहिजे अशी भूमिका नगसेविका सौ रुपाली ठाकुर यानी सहाय्यक आयुक्त यांच्या सोबत बोलतातानां व्यक्त केली.
आणि नागरिकानां आश्वस्त केले की येथे बाजार पुन्हा भरणार नाही, आणि भाजी विक्रेत्याना पण आश्वस्त केले की दक्षिण नागपुर चे आमदार माननीय मोहन भाऊ मते यांना त्यांची व्यथा सांगून नक्कीच काही पर्याय मार्ग काढू, नमपा ला सुद्धा निवेदन दिले जाईल आणि जागा कशी देता येईल हा विचार केला जईल.
तसेच नगरसेविका रुपाली ठाकुर ने नमपा आयुक्त श्री मुंढे साहेब यांनी या समस्या कड़े लक्ष दिले नाही, बाजार बंद ची देखावयाची कार्यवाही केली पन भाजी विक्रेत्याना जागा दिली नाही त्यामुळे पुन्हा अवैध बाजार सुरु झाले.या वर खेद व्यक्त केले. भाजी विक्रेत्याना योग्य जगा द्यावी आणि आपन जे देखावे करता ते बंद करून खरच काही योग्य काम करावे ही विनंती नागरिकांच्या वतीने मनपा आयुक्तानां केली.