- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : बार्टीच्या बुक स्टॉलवर पुस्तके खरेदीसाठी उसळला भीमसागर

नागपूर समाचार : बार्टी संस्थेच्यावतीने 67 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमी परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व इतर महापुरुषाच्या सामाजिक समता प्रस्थापित करणारे पुस्तके, डॉ. बाबासाहेब यांचे खंड, भारताचे संविधान, संविधान उद्देशिका अल्प दरात विक्रीस ठेवण्यात आल्या होत्या. 85 टक्के सवलतीच्या दरात पुस्तक मिळवण्यासाठी बार्टीच्या बुक स्टॉलवर भिमसागर उसळला होता.

बार्टी संस्थेचे महासंचालक सुनिल वारे, बार्टीचे विभागप्रमूख डॉ. सत्येन्द्रनाथ चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अनुयायांसाठी सदर सवलत उपलब्ध करुन देण्यात आली होती.

या उपक्रमात बार्टी नागपूर उपकेंद्राचे सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक अनिल वाळके, प्रकल्प अधिकारी तुषार सुर्यवंशी, शितल गडलिंग, सुनीता झाडे, आकाश कुऱ्हाडे, रामदास लोखंडे, राहूल कवडे, सरीता महाजन, समतादूत विभागाचे प्रकल्प अधिकारी दिनेश बारई आणि समतादूत सहभागी होते.

बार्टीच्या बुक स्टॉलला राज्यभरातील विविध क्षेत्रातील मान्यवर, बौध्द भीखू, समता सैनीक दलाचे कार्यकर्ते, महिला, विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येनी भेट देऊन सवलतीचा लाभ घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *