- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : जागर आणि ढोलताशाची दुर्गोत्‍सवात धूम 

विविध भागात खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सव सम‍ितीचे भव्‍य आयोजन 

नागपूर समाचार  : शहरातील पूर्व, पश्चिम, उत्‍तर, दक्षिण, मध्‍य आणि दक्षिण मध्‍य विधानसभा क्षेत्रात देवीचा जागर आणि ढोलताशाचा गजर घुमू लागला आहे. आद‍िमाया, आदिशक्‍ती दुर्गादेवीच्‍या उपासनेच्‍या या नऊ दिवसात कला, साहित्‍य आणि संस्‍कृतीचे दर्शनदेखील भाविक घेत आहेत. 

कला, साहित्‍य, संस्‍कृती, परंपरांचा प्रचार व प्रसार व्‍हावा, या उद्देशाने केंद्रीय मंत्री मा. श्री. नितीन गडकरी यांनी सण, उत्‍सवांना ‘सांस्कृतिक’ रूप देण्‍याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्‍याअनुषंगाने खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सव सम‍ितीने दुर्गोत्‍सवात विधानसभा क्षेत्र निहाय सांस्‍कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

यात पूर्व विधानसभा क्षेत्रातील दिघोरी, चिखली प्रवेश नगर, वाठोडा लेआऊट, पश्चिम क्षेत्रात हजारीपहाड, काटोल रोड, गणेशनगर, सेम‍िनरी हिल्‍स, उत्‍तर क्षेत्रात जरिपटका, कळमना, वैशाली नगर, पाचपावली, गौरीगौरा चौक, वाडी, दक्षिण विधानसभा क्षेत्रातील सोमवारी पेठ, शाहू नगर, अभ‍िजीत नगर, सक्‍करदरा, मानेवाडा, विश्‍वकर्मा नगर, दक्षिण-पश्चिम क्षेत्रातील साकेत नगर, मध्‍य विधानसभा क्षेत्रातील बांगलादेश नाईकवाडी, इतवारी, प्रेम नगर इत्‍यादी भागातील सुमारे 80 हून अधिक दुर्गोत्‍सव मंडळांमध्‍ये मागील तीन दिवसांपासून संस्‍कृतीचा जागर करण्‍यात येत आहे. या उत्‍सवाचा भाविक मोठ्या संख्‍येने आनंद घेत आहेत. 

या उपक्रमांच्‍या यशस्‍वीतेसाठी खासदार सांस्कृतिक महोत्सव आयोजन समिती, नागपूरचे अध्‍यक्ष प्रा. अनिल सोले, उपाध्यक्ष मधूप पांडे, गौरीशंकर पाराशर, अशोक मानकर, दिलीप जाधव, सचिव जयप्रकाश गुप्‍ता, कोषाध्यक्ष प्रा. राजेश बागडी, सदस्य बाळासाहेब कुलकर्णी, हाजी अब्‍दुल कादिर, संजय गुळकरी, रेणुका देशकर, सारंग गडकरी, अविनाश घुशे, गुड्डू त्रिवेदी, किशोर पाटील, संदीप गवई, चेतन कायरकर, आशिष वांदिले, भोलानाथ सहारे, नितीन तेलगोटे, मनिषा काशीकर यांचे सहकार्य लाभत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *