- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : श्री नितीन गडकरी यांच्या हस्ते कॅरेटलेन – तनिष्क पार्टनरशिपच्या नागपुरातील दुसऱ्या स्टोअरचा शुभारंभ 

प्रताप नगर बनणार दागिन्यांचे नवे ठिकाण 

नागपूर समाचार : कॅरेटलेन या भारतातील आघाडीच्या ओम्नी-चॅनल ज्वेलरी ब्रँडने आज नागपूर शहरात आपले दुसरे स्टोअर सुरू केले. या स्टोअरचे उद्घाटन ग्राहकांच्या उपस्थितीत भारताचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री श्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. या नवीन स्टोअरचे उदघाटन कोळसा फोडून करण्यात आले. नव्या स्टोअरचे आणि भविष्यातील वैभवशाली काळाचे प्रतीक म्हणून या परंपरेने नव्या स्टोअरचा शुभारंभ झाला. 

कॅरेटलेनचे चीफ ऑपरेशन ऑफिसर श्री अतुल सिन्हा यांनी स्टोअर लाँचबद्दल आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, “आमच्या पहिल्या स्टोअरला उदंड प्रतिसाद मिळाला. तसेच प्रताप नगर भागातील ग्राहकांची वाढती गर्दी पाहून आम्हाला आमच्या कॅरेटलेनचा विस्तार करण्याची गरज वाटली. सणासुदीचा काळ जवळ आल्यावर आम्हाला नवीन स्टोअर सुरु करण्याची ही योग्य वेळ आहे असे वाटू लागले. आमच्या रसिक ग्राहकांच्या उपस्थितीत श्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नव्या स्टोअरचे उद्घाटन होणे हा आमचा खरा सन्मान आहे. ग्राहकांकडून मिळालेली ही खरी पोचपावती आहे. त्यांना चांगली सेवा देण्याचा आम्ही प्रयत्न करु.” 

हे ठिकाण ब्रँडसाठी अतिशय योग्य आहे कारण येथे मोठ्या प्रमाणावर ग्राहक आहेत आणि म्हणूनच या स्टोअरसाठी ‘आदर्श ठिकाण’ म्हणून निवडलं.. या ब्रँडचा भर सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यावर केंद्रित आहे. हे स्टोअर ग्राहकांचे हित लक्षात घेऊन त्यांच्या गरजा पूर्ण करेल. ग्राहक कॅरेटलेनच्या आयकॉनिक कलेक्शनमधून डिझाईन्स शोधू शकतात आणि वापरून पाहू शकतात. बटरफ्लाय, ओम्ब्रे, अडा अशा विविध ब्रॅन्डसमधून ग्राहक निवडू शकतात. अलीकडेच नव्याने लाँच केलेले हॅरी पॉटर x कॅरेटलेन आणि त्यांचे अल्पोना हे डिझाइनही स्टोअरमध्ये आहेत. बंगाली कला शैलीचा वापर करुन आणि त्यापासूनच्या आठ डिझाइन्सचा वापर करुन तयार केलेली अल्पोना डिझाइन्स विलक्षण सुंदर आहेत आणि आधुनिक सौंदर्यशील दृष्टीतून तयार केलेली आहेत. 

कॅरेटलेनचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अवनीश आनंद पुढे म्हणाले, “आम्हाला नागपूरमधील प्रताप नगर येथे आमच्या नवीन स्टोअरचे उद्घाटन करताना आनंद होतो आहे. भारताच्या पश्चिम विभागात ५८ स्टोअर्स सुरु करुन आम्ही येथे मोठा विस्तार केला आहे. प्रत्येक नवीन स्टोअरमध्ये आम्ही ग्राहकांना त्यांच्या आवडीच्या ज्वेलरी डिझाइन्स शोधता याव्यात, याकरता पर्याय देत आहोत. ग्राहकांना जवळच्या स्टोअरमध्ये ‘ट्राय ॲट होम’ आणि ‘स्टोअरमध्ये शोधा’ यासारख्या वैशिष्ट्यांचा वापर करून डिझाइन्स पाहता येतील. 

दुकानाचा पत्ता – 28 देव हाइट्स, प्रताप नगर स्क्वेअर, रिंग रोड, नागपूर- 440026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *