- Breaking News, नागपुर समाचार

नागपुर समाचार : आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केल्या मूळे महापौर संदीप जोशींच्या विरोधात पोलीस तक्रार

नागपूर समाचार : नागपूर कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये आम आदमी पार्टीने महापौर संदीप जोशींच्या विरोधात पोलीस तक्रार केली. आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत राज्य सरकारनी काहाडलेल्या आदेशा अनुसार पंनास लोकांन पेक्षा जास्ती लोक जमण्यास मनाई आहे. नागपूर महानगर पालिकेची सभा राज्य सरकारची विशेष परवानगी घेऊन घेण्यात आली आहे.

नागपूर मनपा ची सभा गेल्या पाच दिवसान पासून सुरू आहे. राज्य सरकारची परवानगी देखील महामारी काळात महत्वाचे निर्णय व मुद्दे घेण्यासाठी दिली गेलेली आहे. किरकोळ बाबींन वर्ती चर्चा करून रोज सभा दुसऱ्या दिवशी ढकलन्यात येत आहे. रोज १५० पदाधिकारी, ५० मनपा कर्मचारी, पोलीस ताफा व अन्य लोक मिळून जवळपास ३०० ते ४०० लोक कोविड महामारी काळात एका ठिकाणी जमा होत आहेत. सगळे मनपा पदाधिकारी त्यांच्या प्रभागात जाऊन लोकांना भेटतात. ह्या सभेमुळे पूर्ण नागपूर शहरात कोरोना विषाणू पसराव होण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.

ही सभा नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी बोलावली, नागपूरचे कार्यक्षम मनपा आयुक्तांन विरोधात अहंकारा पोटी ही सभा बोलावण्यात आली असून ही सभा नागपूर च्या जनतेसाठी धोकादायक आहे म्हणून आम आदमी पार्टी या सभेचा निषेध करते.

ही तक्रार देतांना आम आदमी पार्टीचे विदर्भ संयोजक श्री देवेंद्र वानखडे, नागपूर संयोजक श्रीमाती कविता सिंघल, राज्य सहासचिव श्री अशोक मिश्रा, महाराष्ट्र युवा कमिटी सदस्य कृतल वेलेकर, विदर्भ युवा संयोजक पियुष आकरे, नागपूर युवा संयोजक गिरीश तितरमरे, सचिव भूषण ढाकुलकर, नागपुर संगठन मंत्री श्री शंकर इंगोले, प्रभात अग्रवाल सहित मोठ्या संख्येत कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *