- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : भूतकाळातील बलिदान भविष्याच्या देशकार्याची प्रेरणा देते – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

हाइलाइट…

  • केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते संगीतमय लघुपट ‘आझादी’ लाँच
  • स्वातंत्र्य लढ्यातील नायकांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या अनोख्या संकल्पनेची गडकरींनी केली प्रशंसा 

नागपूर समाचार : आपल्या देशाचा इतिहास अतिशय समृद्ध असून, स्वतंत्रता संग्रामातील थोर देशभक्त, क्रांतिकारक यांच्या कार्यतून आपण बोध घेतला तर आपल्याला भविष्याच्या देशकार्याची प्रेरणा मिळते. त्यांचे कर्तृत्व, वक्तृत्व आणि नेतृत्व हे आजच्या पिढीला मोलाचे मार्गदर्शन करते, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. देशभक्ती गीते लहानपणी आपण शाळेत म्हणत असताना ज्या प्रकारे राष्ट्राभिमान जागविला जायचा याची आठवण त्यांनी काढून आज लॉंच झालेल्या ‘आझादी’ संगीतमय लघुपटाचे कौतुक केले.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज शुक्रवारी नागपूर येथे एका दिमाखदार कार्यक्रमात ‘आझादी’ या म्युझिकल शॉर्ट फिल्मचे लाँचिंग करण्यात आले. हा लघुपट एसके म्युझिकवर्क्स कडून ‘आझादी का अमृत महोत्सवा’च्या स्मरणार्थ तयार करण्यात आला आहे. या संगीतमय लघुपटात भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्याला दर्शविणारे विलक्षण गाणे समाविष्ट करण्यात आले आहे. हे गाणे सिद्धार्थ कश्यप यांनी संगीतबद्ध केले असून याची संकल्पना देखील त्यांचीच आहे. प्रसिद्ध गायक मोहित चौहान यांनी हे गीत गायले आहे आणि शकील आझमी यांनी त्याचे बोल लिहिले आहे. या लघुपटाचे लेखन आणि दिग्दर्शन अंशुल विजयवर्गीय यांनी केले आहे. ‘आझादी’ लघुपटाची संपूर्ण टीम या लाँच सोहळ्याला उपस्थित होती. नितीन गडकरी यांच्या हस्ते एव्ही लाँच होण्यापूर्वी या लघुपटाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. 

स्वातंत्र्यलढ्यातील खऱ्या नायकांना आदरांजली वाहण्याच्या सिद्धार्थ कश्यपच्या अनोख्या संकल्पनेची केंद्रीय मंत्र्यांनी प्रशंसा केली. त्यांनी संपूर्ण चमूचे अभिनंदन केले आणि लघुपटाच्या यशासाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सिद्धार्थ कश्यप म्हणाले की, नितीन गडकरी हे प्रभावशाली व्यक्तिमत्व असून पण त्यांच्या कामातून प्रेरणा घेतो. नवीन भारताचे आदर्श नेतृत्व गडकरी असून त्यांनी भविष्याचा वेध घेऊन देशाच्या पायाभूत सुविधा क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. पुढे लघुपटाबद्दल सांगताना ते म्हणाले की संगीतकार या नात्याने मला 1857 ते 1947 पर्यंतचा संपूर्ण भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा प्रवास शक्तिशाली संगीताच्या माध्यमातून अनुभवायचा होता. याशिवाय, मनोरंजनाच्या माध्यमांतून आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी केलेल्या सर्वोच्च बलिदानाबद्दल तरुणांमध्ये जागरूकता निर्माण करायची होती. ‘आझादी’ साठी संशोधन आणि तांत्रिक तपशील मिळण्यासाठी जवळपास एक वर्ष लागले, अशी माहिती त्यांनी दिली.

ते पुढे म्हणाले, हा लघुपट प्रेक्षकांना स्वातंत्र्य लढ्याच्या प्रवासाच्या मोहिमेवर घेऊन जातो, त्यांची आकलनशक्ती समृद्ध करतो आणि देशाप्रति आदर वाढवतो. हा काल्पनिक लघुपट भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्वपूर्ण ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होण्यासाठी जादुई प्रवासची अनुगहुटी देतो. 

गायक मोहित चौहान यांनी लॉन्चिंग प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, सध्याच्या पिढीला आजादी सारख्या गाण्याची नितांत गरज आहे. हा एक कठीण पण थरारक अनुभव होता कारण गाणे त्या सर्व ऐतिहासिक हालचालींना भावनिकदृष्ट्या जिवंत करण्याविषयी आहे. वेळेच्या प्रवासासोबत समांतर होणारे चढ-उतार खरोखरच आव्हानात्मक होते. मी या प्रोजेक्टचा खूप आनंद घेतला आणि हे गाणे माझ्या हृदयाच्या अगदी जवळ असलेल्या सर्वोत्कृष्ट गाण्यांपैकी एक आहे.

गीतकार शकील आझमी म्हणाले की, हे गाणे अनेक अंगांनी वेगळे आहे. हे गाणे लिहिणे कठीण होते कारण त्यात ज्ञात आणि अज्ञात नायकांच्या नावाचा उल्लेख न करता त्यांच्या भावनांचा समावेश आहे . स्वातंत्रयचा दिवस पाहण्याच्या एकमेव उद्देशासाठी ब्रिटीशांचा सतत छळ सहन करणाऱ्या सर्वांच्या बलिदानाला हे गाणे सलाम करते. हे गाणे आजच्या तरुणांसाठी कष्टाने मिळवलेल्या स्वातंत्र्याचे महत्त्व अधोरेखित करते. अशा प्रकारे गाण्याची हुक लाइन म्हणजे ‘बडी मेहंगी है ये आझादी’.

आझादीने मला किशोरवयीन, तरुण आणि प्रौढांना आज ज्या संकटाचा सामना करावा लागतो त्याबद्दल माझे विचार मांडण्याची संधी दिली. लेखक आणि दिग्दर्शक या नात्याने, माझे विचार कमी न करता ही शॉर्ट फिल्म बनवता आल्याबद्दल मी कृतज्ञ आहे, असे दिग्दर्शक अंशुल विजयवर्गीय यांनी सांगितले. व्हीएफएक्स इफेक्टसह इतिहासाची वास्तविक उदाहरणे शक्तिशाली गीत आणि गायन यांच्याद्वारे समर्थित स्क्रीनवर जिवंत केली जातात. शिवाय, व्हिडिओ अखंडपणे ऑडिओला पूरक आहे, ज्यात आकर्षक आणि कलात्मकरित्या तयार केलेले शॉट्स आणि दृश्यांना आनंद देणारी दृश्ये आहेत.

या वेळी आझादीच्या संपूर्ण चमुचा सत्कार गडकरी यांच्या हस्ते करण्यात आला. आझादीच्या टीमने संगीतमय लघुपट यशस्वी करण्यासाठी मोठ्या संख्येने लाईक आणि शेअर करण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *