- Breaking News, नागपुर समाचार

नागपुर समाचार : आर.के. एस पब्लिक स्कूल जरिपटका येथे वर्षा दिवस साजरा

नागपुर समाचार : श्रीमती कमलादेवी रिवयानी बहुउद्देशीय संस्था द्वारा संचालित आर.के.एस पब्लिक स्कूल (सीबीएसई), नारा येथील विद्यार्थ्यांनी वर्षा ऋतु चे आगमन प्रित्यर्थ “वर्षा दिवस’ साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून सचिव श्रीमती उषा रिवयानी उपस्थित होत्या.

प्रिन्सिपाल श्रीमती कीर्तिशोनी यांनी सर्व लहान मुलांना वर्षा ऋतु ची संपुर्ण माहिती दिली, याप्रसंगी लहान मुलांनी विविध रंगाचे छाते हातात घेऊन नृत्य केले व वर्षा ऋतु वर आधारित इंग्रजी व हिन्दीच्या कविता म्हणून दाखविल्या. कार्यक्रमाचे संचालन रोशनी काले व स्नेहा भोंबे यांनी केले तर आभार रक्षा साबळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्रियंका शिंगनापुरे, रविन्द्र सिंह व रोशनी लाड यांनी योगदान दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *