- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : प्रेस क्लब मध्ये “योगा दिन” साजरा

नागपूर समाचार : पत्रकार क्लब ऑफ नागपूर आणि अंकुर सीड्स यांच्या संयुक्त विद्यमाने आज, 21 जून रोजी सकाळी 7 वाजता पत्रकार क्लब मध्ये योग दिनाच्या निमित्ताने योगाभ्यास करण्यात आला. यावेळी पत्रकार क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र, अंकुर सीड्सचे कंपनी सेक्रेटरी वासुदेव उमाळकर, वरिष्ठ पत्रकार एस. एन. विनोद, डॉ. उदय बोधनकर आणि पाखमोडे साहेब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रदीप मैत्र यांनी उपस्थितांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

एस. एन. विनोद यांनी यावेळी बोलताना योगदिनाचे महत्त्व सांगून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जागतिक योग दिन आयोजित करण्याचे श्रेय जाते, हे सांगितले. दैनंदिन जीवनात योगाला महत्तव दिल्यास मनुष्यास निरोगत्व प्राप्त होते, असेही त्यांनी सांगितले. वासुदेव उमाळकर यांनी लॉक डाऊन पासून योगाचा परिचय झाल्याचे सांगून तेव्हापासून वैद्यकीय रजा घेण्याची पाळी आली नसल्याचे नमूद केले.

यानंतर प्रख्यात योगतज्ज्ञ आशिष पर्वते यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी सामूहिक सूर्यनमस्कार, पर्वतासन, ताडासन, नौकासन, प्राणायाम, ओंकार जप, शवासन आदी अनेक आसने केली.

50 हून अधिक व्यक्तींनी योगाचा लाभ घेतला. यामध्ये पत्रकार क्लबचे अध्यक्ष प्रदीप कुमार मैत्र, एस एन विनोद, वासुदेव उमाळकर, त्यांच्या पत्नी डॉ. उमाळकर, तरुण भारतचे चारुदत्त कहू, शामकांत पात्रीकर, डॉ. उदय बोधनकर, पाखमोडे, विनायक पुंड, अश्विन सव्वालाखे, अशोक माटे आणि पत्रकार क्लब नागपूरचे सर्व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. चहापाणी नाश्त्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *