- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : स्‍वानंदच्‍या नाट्य प्रशिक्षण श‍िबिराचा थाटात समारोप 

नागपूर समाचार : स्वानंद सांस्कृतिक मंडळ व स्त्री शिक्षण प्रसारक मंडळातर्फे घेण्‍यात आलेल्‍या नाट्य प्रशिक्षण शिबीराचा समारोप थाटात पार पडला. स्‍वानंदच्‍या रौप्‍य महोत्‍सवी वर्षानिमित्‍त आयोजित करण्‍यात आलेल्‍या या शिबिरात मोठ्या संख्‍येने शालेय – महाविद्यालयीन विद्यार्थ्‍यांनी सहभाग घेतला. 1 मे ते 1 जूनदरम्‍यान झालेल्‍या या शिबिराला विनोद काळे, देवेन्द्र लुटे, प्रियंका ठाकूर, मुकुंद वसुले, वंदना महाजन, रक्षंदा मुलकलवार,जान्‍हवी वासमवार यांचे मार्गदर्शन लाभले.

समारोपीय कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी स्‍त्री शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रविन्द्र फडणवीस होते तर प्रमुख पाहुणे म्‍हणून बाल अकादमीच्‍या अध्‍यक्ष मधुरा गडकरी, सुबोध आष्टीकर, सीमा फडणवीस, पाटील मॅडम, स्‍वानंदचे रोशन नंदवंशी यांची उपस्‍थ‍िती होती. 

अध्यक्षांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्‍यांना सातत्य राखण्‍याचे आवाहन केले. मधुरा गडकरी यांनी शुभेच्छा दिल्या व संस्थेने 25 वर्षाचा पल्‍ला यशस्‍वीरित्‍या गाठल्‍याबद्दल कौतुक केले.

कार्यक्रमाचे संचालन प्राची व्यवहारे यांनी तर प्रास्ताविक गार्गी कुलकर्णी यांनी केले. उज्‍ज्‍वला गुगीलवार यांनी मनोगत व्‍यक्‍त केले. कुमुदीनी केले यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *