- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार: बॉलिवूड हिट्स रेट्रो म्युझिकल कॉन्सर्ट आज 

नागपूर समाचार : श्री सिद्धिविनायक पब्लिसिटी प्रस्तुत’ बॉलिवूड हिट्स रेट्रो म्युझिकल’ कॉन्सर्ट आज बुधवार दिनांक २९ मार्च २०२३ रोजी संध्याकाळी ६ वाजता सायंटिफिक हॉल लक्ष्मी नगर नागपूर येथे आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमात हिंदी चित्रपटातील सदाबहार गीते प्रस्तुत करण्यात येतील. या कार्यक्रमाला निकेता जोशी या पाहुण्या गायिका म्हणून उपस्थित राहणार असून विविध गीतांची प्रस्तुती देतील.

याशिवाय प्रशांत अनवाने, डॉ. प्रवीण जाधव, प्रो. सुनील सुभेदार, शशिकांत वाघमारे, आभा कालकोटवर, मनश्री जोशी, अनघा वैद्य, आशिष पाटील, प्रदीप भगत, सुनील माहूरकर आणि नरेंद्र माथुरकर ही गायक मंडळी विविध गीतांचे सादरीकरण करतील. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रश्मी बडे करणार आहेत. कार्यक्रम नि:शुल्क असून श्री सिद्धिविनायक पब्लिसिटीचे समीर पंडित यांनी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *