- Breaking News, विदर्भ

नागपूर समाचार : अखिल भारतीय माहिती सेवा समिती तर्फे कामगारांसाठी ‘कार्यशाळा’चे आयोजन

वरील विषय आपणास कळविण्यात येते कि अखिल भारतीय माहिती सेवा समिती तर्फे शोषित, पिडीत, अन्यायग्रस्त, कष्टकरी, कंपनी कामगार यांच्या मुलभूत अधिकार, त्यांचे हक्क, अधिकार, संरक्षण, इत्यादी विषयी कायदे, अधिकार यांच्याबाबत जनजागृती व जास्तीत जास्त कामगारांपर्यंत माहिती होण्यासाठी अखिल भारतीय माहिती सेवा समिती एक दिवस कार्यशाळाचे आयोजन दिनांक : १०/०३/२०२३ रोजी सकाळी १० वाजता बळवंत वाचनालय, औरंगपुरा, छत्रपती संभाजीनगर येथे केले आहे.

या कार्यशाळेत प्रमुख पाहुणे ऑड. बाबासाहेब वावलकर (ADV. HIGH COURT AND DISTRICT COURT, राज्य अध्यक्ष- अखिल भारतीय वकील संघ) व अॅड. रविंद्र शिरसाठ असून प्रमुख मार्गदर्शक अॅड. सुरेश मंचेरीयाल हे करणार असून या कार्यशाळेत जास्तीत जास्त नागरिकांनी, विविध क्षेत्रातील कामगारांनी सहभाग घ्यावा असे आव्हान अॅड. शिवानी जैस्वाल, महिला अध्यक्ष व प्रवक्ता सत्संगराज सोनवणे शहराध्यक्ष, इब्राहीम खान शहराध्यक्ष (मध्य) यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी ७३०४१०४१३९, ९९७०९१३४३८, ८२३७९११०१८५ या मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा. क्रायक्रमाची तारीख व वेळ : १०/०३/२०२३ रोजी सकाळी १० वाजता. स्थळ : बळवंत वाचनालय, पहिला मजला, महात्मा ज्योतिबा व सावित्रीबाई फुले चोक, औरंगपुरा, छत्रपती संभाजीनगर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *