- Breaking News, नागपुर समाचार

महाराष्ट्र समाचार : अनाथांच्‍या संरक्षण व काळजीसाठी महिला व बाल विकास मंत्रालय व स्‍वनाथ फाउंडेशनमध्‍ये सामंजस्‍य करार 

महाराष्ट्र समाचार : काळजी व संरक्षणाची गरज असलेल्‍या राज्‍यातील बालकांना त्‍यांचे हक्‍क, प्रेम, काळजी, शिक्षण व सुरक्षित वातावरण मिळावे यासाठी महिला व बाल विकास मंत्रालय महाराष्‍ट्र राज्‍य व स्‍वनाथ फाउंडेशन, मुंबई यांच्‍यात सामंजस्‍य करार करण्‍यात आला. 

महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र राज्य कॅबीनेट मंत्री सन्माननीय श्री मंगल प्रभात लोढाजी, आयुक्त श्रीमती आर. विमला जी, श्री. राहुल मोरे जी व स्वनाथ फाऊंडेशन च्या संस्थापक, कार्यकारी विश्वस्त सौ. श्रेया भारतीय व विश्वस्त श्री गगन महोत्रा व सौ. सारिका पन्हाळकर यांची यावेळी उपस्थिती होती. प्रति-पालकत्व योजनेस समाजात स्थान मिळावे या उद्देशाने महिला व बाल विकास मंत्रालय महाराष्ट्र राज्य आणि स्वनाथ फाऊंडेशन, मुंबई यांच्यामध्ये संलग्नतेने सामंजस्य करारावर दिनांक 23 फेब्रुवारी 2023 रोजी स्वाक्षरी करण्यात आली.

महिला व बाल विकास विभाग राज्यामध्ये बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 व महाराष्ट्र राज्य बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) नियम 2018 सदर अधिनियमांच्या अधीन राहून तसेच वेळोवेळी होणा-या सुधारणांच्या अनुषंगाने काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांच्या बाबतीतील निर्णय तसेच, योजना योग्य पद्धतीने कार्यान्वित व्हावी म्हणून व 18 वर्षाखालील काळजी व संरक्षणाची गरज असलेली तसेच विधीसंघर्षग्रस्त बालके लवकरात लवकर समाजाच्या प्रवाहात यावे व समाजामध्ये कुटुंबाधारित सेवांना महाराष्ट्र राज्यात प्रोत्साहन व प्राधान्य मिळावे तसेच, प्रति-पालकत्व सेवेस समाजात स्थान मिळावे, या हेतूने हा सामंजस्य करार करण्यात आल्या आहे. 

‘स्वनाथ फाऊंडेशन’ एक स्वयंसेवी संस्था असून अनाथांच्या पुनर्वसनासाठी सुरु असलेली देशव्यापी प्रभावी चळवळ आहे. ‘‘प्रत्येक अनाथ..नाही..स्वनाथ मुलाला कुटुंब मिळावं’’ हे स्वनाथ फाऊंडेशनचे ध्येय आहे. मुलांचे बालपण हे सुखी, समृद्ध व्हावे व मुलांना वात्सल्य, प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकी कुटुंबातच मिळू शकते असा दृढ विश्वास बाळगून समाजामध्ये कुटुंबाधारित सेवांना प्रोत्साहन व प्राधान्य मिळावे तसेच प्रति-पालकत्व सेवेस समाजात स्थान मिळावे म्हणून स्वनाथांच्या (अनाथांच्या) सर्वोत्तम हितासाठी ‘स्वनाथ फाऊंडेशन’ कार्यरत आहे.

स्‍वनाथ फाउंडेशन या करारांतर्गत राज्‍यातील 50 बालकांचे प्रतिपालत्‍व घेणार असून त्‍यांना सुरक्षित वातावरण देण्‍यासोबतच त्‍यांचे शिक्षण करणार आहे, असे मंगलप्रभात लोढा यांनी यावेळी सांगितले. सौ. श्रेया भारतीय म्हणाल्या ही आमच्यासाठी एक महत्वाची घटना घडतेय संस्थेमध्ये राहणा-या अनाथ आणि ज्यांना काळजी आणि संरक्षणाची गरज आहे. अशा बालकांसाठी त्यांच्या सर्वोत्तम हितासाठी आज मंत्रालयात ऐतिहासिक घटना घडतेय व स्वनाथ फाऊंडेशनची सगळी टीम याची साक्षीदार होते आहे याचा आनंद आहे. स्वनाथला कायम भक्कम आधार देउन सोबत उभे राहण्यासाठी सर्वांचे त्यांनी मनापासून आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *