- Breaking News, नागपुर समाचार, विदर्भ

हिंगणघाट समाचार : आ. समिरभाऊ कुणावार यांचे प्रयत्नातून हिंगणघाट एसटी आगाराला मिळाल्या १० नवीन बसगाड्या

प्रवासी मित्र संघटनेने व्यक्त केले आभार; आ. समीरभाऊ कुणावार यांनी केली ४० बसगाडयाची मागणी.

हिंगणघाट समाचार : हिंगणघाट विधानसभा क्षेत्राचे कार्यसम्राट आमदार समिर कुणावार यांचे विशेष प्रयत्नातून हिंगणघाट एसटी आगाराला नवीन १० एसटी बसेस आल्या असून या १० बसगाडया हिंगणघाट येथील ताफ्यात रुजू झालेल्या आहेत.

आमदार समीरभाऊ कुणावार यांनी एकूण ४० बसगाड्यांची मागणी शासनाकडे केली होती, प्रथम चरणात आता १० बसगाडया येथे कार्यरत झाल्या आहेत.

येथील आगारास नवीन बसगाड्या मिळाव्या यासाठी आमदार समीर कुणावार यांनी उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, तसेच परिवहनमंत्री यांचेकडे जोरदार मागणी केली होती.

या मागणीतूनच या १० नवीन बसगाड्या हिंगणघाट आगाराला मिळाल्या आहेत. येथील आगारातील जुन्या बस गाड्याची अवस्था अत्यंत खराब असल्या कारणाने तसेच वाहने नादुरुस्त असल्यामुळे प्रवाशांना अशा बसमधून प्रवास करणे कठीण झाले होते, या आगारास नवीन बसगाड्या देण्यात याव्यात अशी येथील प्रवासी जनतेची मागणी होती.  

ग्रामीण भागातील विद्यार्थी, शेतकरी,महीला तसेच विद्यार्थिनींना नादुरुस्त बसेसमुळे प्रवास करतांना मोठा त्रास होत होता, परंतु आता या नवीन १० बस गाड्या आगारातील ताफ्यात रुजू झाल्यामुळे प्रवासी मित्र संघटनेचेवतीने आ. समिरभाऊ कुणावार यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहे.

जुन्या नादुरुस्त बसेसमुळे येथील एसटी आगाराचे कर्मचाऱ्यानासुद्धा मोठा त्रास होता, नादुरुस्त तसेच भंगार अवस्थेतील बसगाड्यामुळे प्रवासी जनतेचा रोष कर्मचाऱ्यांना पत्करावा लागतो, काही उशीर का होईना आता त्यांनाही नव्या आलेल्या वाहनांमुळे समाधान लाभले आहे. यामुळे हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील सर्वसामान्य जनतेने आमदार समीरभाऊ कुणावार यांचे आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *