- Breaking News

नागपूर समाचार : विद्यार्थ्‍यांनी मोहापासून दूर राहावे – स्‍वामी ज्ञानमर्तयानंद महाराज

भारती कृष्‍ण विद्या विहारच्‍या विद्यार्थ्‍यांना निरोप 

नागपूर समाचार : विद्यार्थ्यांनी जीवनात पाऊल टाकताना आपली मुळे विसरू नये. त्‍यांनी भौतिक मोहांपासून दूर राहून परीक्षेत लक्ष केंद्रित करावे, असा सल्‍ला रामकृष्ण मठ, नागपूरचे स्वामी ज्ञानमूर्तयानंद महाराज यांनी दिला.

विश्‍व पुनर्निमाण संघांतर्गत येणा-या भारती कृष्ण विद्या विहार येथे इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप व आशीर्वाद देण्‍याचा कार्यक्रम विद्यालयात आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे रामकृष्ण मठ, नागपूरचे स्वामी ज्ञानमूर्तयानंद महाराज होते. विश्‍व पुननिर्माण संघाचे सहसचिव अश्विन घटाटे, कोषाध्‍यक्ष अतुल देव, विश्‍वस्‍त श्रीकांत देशपांडे, डॉ. अर्चना चौधरी, तरुण पटेल, स्मिता बोकारे, मुख्‍याध्‍यापिका छाया चतुर्वेदी, उपमुख्‍याध्‍यापिका अनिता नंदा समुद्रे, पर्यवेक्षिका भावना घुबे आणि प्री प्रायमरीच्‍या पर्यवेक्षिका राखील पांडेय यांची उपस्थिती होती. 

श्रीकांत देशपांडे यांनी वेळेचे योग्य व्यवस्थापन करण्याबाबत मार्गदर्शन केले तर तरुण पटेल यांनी विद्यार्थ्यांना त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी जीवनात योग्य मार्ग निवडण्याचे आवाहन केले. डॉ. अर्चना चौधरी यांनी विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करून सोशल मीडियापासून दूर राहण्याचे आवाहन केले. कृतज्ञता व्यक्त करणारी निरोपाची भाषणे दहावीची विद्यार्थींनी मोली मिश्रा आणि बारावीची भूमिका सुर्यवंशी यांनी केली. श्रद्धा बोरकर आणि डॉ. मेधा तिवारी यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. रती चौधरी हिने आभार प्रदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *