- Breaking News, नागपुर समाचार, विदर्भ

गोंदिया समाचार : गोंदिया – भंडारा जिल्ह्यातील विद्यार्थी सुवर्ण पदकाने सन्मानित होणार

स्व. मनोहरभाई पटेल जयंतीनिमित्त गुरुवारी कार्यक्रम

गोंदिया समाचार : गोंदिया – भंडारा जिल्ह्याचे स्वनामधन्य नेता व शिक्षण महर्षी स्व. मनोहरभाई पटेल यांच्या ११७ व्या जयंतीनिमित्त गोंदिया- भंडारा जिल्ह्यातील शालान्त आणि पदवी परीक्षेत सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना स्व. मनोहरभाई पटेल स्मृती सुवर्ण पदक प्रदान करण्यासाठी ९ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता गोंदिया येथील धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयाच्या प्रांगणात भव्य सुवर्ण पदक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.

सुवर्ण पदक वितरण समारंभात कार्यक्रमाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येईल. अध्यक्षस्थानी खा. प्रफुल्ल पटेल राहतील. यावेळी लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन तथा माजी खा. विजय दर्डा, उद्योगपती सज्जन जिंदल, चित्रपट अभिनेते जॅकी श्रॉफ व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या विद्यार्थ्यांचा होणार सत्कार सुवर्ण : पदकाने सन्मानित होणाऱ्या विद्यार्थ्यामध्ये गोंदिया जिल्ह्यात एस.एस.सी. मध्ये सर्वाधिक गुण प्राप्त नक्षत्रा बावनकर व वेदी बिसेन, एच.एस.एस.सी.मध्ये आस्था बिसेन, अमन अग्रवाल, बी.ए. अलदीप डहाट, बी.कॉम. प्रगती चटवानी, बी.एस.सी. काजल चौहान, बी. फार्मसी ओम पटले तसेच भंडारा जिल्ह्यातून एस.एस.सी. मध्ये सर्वाधिक गुण प्राप्त तन्वी तलमले, एच.एस.एसी- नमीत व्यवहारे, बी.ए.- शुभम ठोंबरे, बी.कॉम. मिहीर चकोले, बी.एससी. लिन्टा टॉमसन, बी. ई. प्रशांत तरोने यांचा समावेश आहे.

सुवर्ण पदक वितरण समारंभास नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे. असे स्व, मनोहरभाई पटेल स्मृती समिती, गुजराती राष्ट्रीय केलवणी मंडळ, मनोहरभाई पटेल अकादमी, गोंदिया शिक्षण संस्थामार्फत वर्षा पटेल, माजी आमदार हरिहरभाई पटेल व माजी आमदार राजेंद्र जैन यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *