- Breaking News, नागपुर समाचार

काटोल समाचार : क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले व त्यागमूर्ति रमाई आंबेडकर यांचा जयंती निमित्त भव्य प्रबोधनात्मक दोन दिवसीय शायरी व कव्वाली चा कार्यक्रम काटोल येथे आयोजित

काटोल समाचार : पीपल्स रिपब्लिकन पार्टी नागपुर जिला तर्फे भीमा कोरेगांव शौर्य दिन, नामांतर दिन, राष्ट्रमाता जिजाऊ, क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले व त्यागमूर्ति रमाई आंबेडकर यांचा जयंती निमित्त भव्य प्रबोधनात्मक दोन दिवसीय शायरी व कव्वाली चा कार्यक्रम काटोल येथे आयोजित केला.

सर्व मुख्य मार्गावर निळे व पंचशीलचे झेंडे काटोल नगरीचे आकर्षण ठरले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष पीपल्स रिपब्लिकन पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार, प्राध्यापक जोगेंद्कवाडे सर तर उदघाटन काटोल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माननीय चरणसिंगजी ठाकूर हे होते. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भाई जयदीप कवाडे, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे शहर अध्यक्ष कैलासजी बोंबले, राष्ट्रीय मजदूर सेनेचे नेते बाळूमामा कोसमकर, काटोल कृती समितीचे नेते प्रदीप उबाळे पाटील, रिपब्लिकन नेते भीमरावजी बनसोड, विदर्भ शाहीर कलाकार परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष अलंकारजी टेंभुर्णे, महाराष्ट्र न्यूज चैनल चे विदर्भ ब्युरो चीफ युवराज मेश्राम, पीपल्स रिपब्लिकनपक्षाचे नेते भीमराव कळमकर हे होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व थोरपुरुषांना पाहुण्यांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करण्यात आली.सर्व थोरपुरुषांचा जयघोष करण्यात आला. जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. सर्व पाहुणे मंडळींना पुष्पमाला व शिल्ड देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष भाई नरेंद्र डोंगरे यांनी केले. त्यांनी प्रास्ताविक मध्ये सांगितले की, या देशांमध्ये अनेक थोर पुरुषांच्या जयंती होत असतात. परंतु ज्याप्रमाणे थोर पुरुषांच्या जयंती होतात. त्याप्रमाणेच ज्या शिवाजी महाराजांना जिजाऊने घडविले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना रमाईने तन-मन-धनाने सहकार्य केले. ज्या महात्मा ज्योतिबा फुलेला खांद्याला खांदा लावून शैक्षणिक चळवळीमध्ये ज्यांनी हातभार लावला.

अशी सावित्रीबाई फुले या तिन्ही महान मातेची जयंती मोठ्या थाटामध्ये साजरी करावी असे पीपल्स रिपब्लिकन पार्टी नागपूर जिल्ह्याच्या बैठकीमध्ये ठरले आणि म्हणून मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात यावे या नामांतर विद्यापीठाला 16 वर्ष चळवळीमध्ये अनेक आंदोलन केले. अनेक चळवळी केल्या. अनेक मोर्चे काढले. जेलमध्ये जावे लागले आणि 16 वर्षानंतर मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात आले. त्या चळवळीची आठवण, त्या नामांतर दिनाची आठवण, नामांतराकरता शहीद झालेल्या भीमसैनिकांना मानवंदना म्हणून नामांतर दिन हा साजरा केला पाहिजे असे आम्हाला वाटले. त्याचप्रमाणे 28000 पेशव्यांना 500 महारा नीं हरविले तो दिवस शौर्य दिन म्हणून संपूर्ण भारतामध्ये साजरा केला जातो आणि म्हणून तो शौर्य दिन सुद्धा आपण मोठ्या थाटामाटाने साजरा केला पाहिजे.

म्हणून हा दोन दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला. पहिल्या सत्रामध्ये प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर हे कार्यक्रमाचे अध्यक्ष तर उदघाटक काटोल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती चरणसिंगजी ठाकूर तर दुसऱ्या सत्रामध्ये अख्या महाराष्ट्रामध्ये गाजलेले शाहीर अंबादास नागदिवे व आंबेडकरी विचाराचा वारसा चालविणारे प्रबोधनकार शाहीर पुरुषोत्तम खांडेकर यांच्या खडी गमतीचा दुय्यम चा मुकाबला संपन्न झाला. दोन्ही शाहीर यांनी थोर पुरुषांच्या विचारावर प्रकाश टाकून या देशामध्ये असलेला अनेक जुन्या रूढी परंपरे वर गायनाच्या माध्यमातून हल्ला केला. त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी 12 कव्वालांचा प्रबोधनात्मक गीत गायनाचा कार्यक्रम घेण्यात आला.

पहिल्या सत्रामध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष नरखेड पंचायत समितीचे माजी सभापती माननीय नरेश भाऊ अरसडे, तर कार्यक्रमाचे उदघाटक प्रख्यात कव्वाल अनिरुद्ध शेवाळे हे होते. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी काटोल पंचायत समितीचे सभापती संजयभाऊ डांगोरे, प्रेमानंदजी ऊके काटोल कृती समितीचे नेते प्रदीप उबाळे पाटील, नरखेड पंचायत समितीचे माजी सदस्य सतीश भाऊ रेवतकर, सत्कारमूर्ती महेंद्रजी गायकवाड, राहुलजी वानखेडे रिपब्लिकन नेते भीमरावजी बनसोड, अशोक जोगसनिया हे होते. याप्रसंगी अर्चनाताई बडोदेकर मॅडम, मंदाताई डोंगरे मॅडम, कल्पनाताई गायकवाड मॅडम यांची विशेष उपस्थिती होती. याप्रसंगी दुसऱ्या सत्रामध्ये आंबेडकरवादी 12 कव्वाल् यांचा प्रबोधनात्मक संगीतमय कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक कवाडे सरांनी सर्व थोर पुरुषांच्या विचारावर प्रकाश टाकून संविधानाचे महत्त्व पटवून दिले. या कार्यक्रमाचे आयोजक भाई नरेंद्र डोंगरे यांचे कौतुक केले.

विदर्भ शाहीर कलाकार परिषदेचे कार्याध्यक्ष अलंकारजी टेंभुर्णे यांनी कलावंताकरिता असलेल्या अनेक योजना चा लाभ कलावंतांनी घ्याव्या आणि विदर्भ शाहीर कलाकार परिषद त्याकरता सहकार्य करेल हे आपल्या भाषणांमधून सांगितले. तर भाई जयदीपजी कवाडे यांनी आंबेडकरवादी विचारावर विशेष असे मार्गदर्शन केले.काटोल पंचायत समितीचे सभापती संजय डांगोरे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, पंचायत समितीच्या योजना आहेत ,त्या योजना नीपक्ष पणे गोरगरीब, दलित, आदिवासी, ओबीसी घटकापर्यंत पोहोचण्याचे काम करणार आहो. कोणतीही अडचण असल्यास आमची सहकार्य करण्याची तयारी आहे असे संबोधन केले.

दुसऱ्या दिवशी दुसऱ्या सत्रामध्येसुप्रसिद्ध ख्यातनाम कव्वाल विकास राजा, त्याचप्रमाणे लोकशाहीर अरुण सहारे, कवी ज्ञानदीप बागडे यवतमाळ, प्रकाश राऊत, अजय कुमार खोब्रागडे, मदनबाबू भारती, धम्मचक्र तामगाडगे, रोशन कुमार, गायिका सुनिता सरगम, गायिका सूर्यकांता पाटील, गायिका राणी तबस्सुम हा कार्यक्रम यशस्वी ते करिता कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य संजय बडोदेकर, सुप्रसिद्ध ख्यातनाम प्रबोधनकार कव्वाल भीमेश भारती, पीपल्स रिपब्लिकन पार्टी जिल्ह्याचे नेते संजयभाऊ खांडेकर, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे तालुका नेते संजयजी गायकवाड, जिल्ह्याचे नेते बळवंत नारनवरे, सामाजिक कार्यकर्ते वासुदेव बोरघाटे, रमेश मसाने, अरुण तागडे, मिलिंद बनसोड, मिलिंद गजभिये,शाहीर गौरीशंकर गजभिये, धर्मपाल गजभिये, शंकर कदम, रमेश मसाने, दीपक खांडेकर, गुंडेराव अडकिने, अतुल मेश्राम, अनित ढवराळ, बाबाराव गोंडाणे, तुकाराम देशभ्रतार यांनी अथक परिश्रम घेतले.दोन्ही दिवशी भरगच्च कार्यक्रम शांततामय सुव्यवस्थित संपन्न झाला.

या दोन्ही दिवसाच्या कार्यक्रमांमध्ये हजारोच्या संख्येने स्त्री, पुरुष हजर होते. त्यामुळे मुख्य आयोजक भाई नरेंद्र डोंगरे यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाचे संचालन पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हा कोषाध्यक्ष अरुणभाऊ वाहने यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *