
नागपूर समाचार : 29/01/2023 रोजी श्रीमती दादीबाई देशमुख हिंदू मुलींची शाळा येथील सुंदराबाई साने सभागृहात “वसा लेकीच्या शिक्षणाचा” या योजने अंतर्गत स्नेह मिलना चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.आमच्या शाळेत येणारी प्रत्येक विद्यार्थिनी ही आमची लेक आहे लेकीच्या कल्याणार्थ ही योजना राबविली जाते.
शिक्षण हा प्रत्येक विद्यार्थिनीचा हक्क आहे आणि यामध्ये आर्थिक दुर्बलतेचा अडथळा येऊ नये व त्यांचे शिक्षण पूर्ण कसं करता येईल याकरता प्रयत्नशील असणारे स्त्री शिक्षण प्रसारक मंडळ व दादीबाई देशमुख हिंदू मुलींची शाळा तसेच शाळेचे हित जपणारी अनेक माणसे, दरवर्षी मदत करीत असतात त्यामुळे अनेक मुलींचा शिक्षणाचा मार्ग सुकर होतो. त्याकरिता कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता हा स्नेहमिलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष श्री रविंद्र फडणवीस सर, संस्थेच्या सचिव मीरा चाफेकर, संस्थेच्या सहसचिव मुक्ता फडणवीस अय्यर, संस्थेचे सदस्य खोडे सर, महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या वंदना भागडीकर, शाळेच्या मुख्याध्यापिका माया बमनोटे, अध्यक्षांच्या प्रतिनिधी सीमा फडणवीस, पालक वर्ग, या योजने शी जुळलेले सर्व दाते, शाळेचा शिक्षक वृंद व कर्मचारी वर्ग उपस्थित होते .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका माया बामनोटे मॅडम यांनी केले , कार्यक्रमात आपले मनोगत विजय भागडीकर यांनी व्यक्त केले तर सूत्रसंचालन वंदना महाजन मॅडम यांनी केले.